काँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले

पुण्यामध्ये झालेल्या कार अपघातातून काँग्रेस आमदार विश्वजीत कदम थोडक्यात बचावल्याची माहिती आहे.

काँग्रेस आमदार विश्वजीत कदम पुण्यात कार अपघातातून थोडक्यात बचावले

पुणे : काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि सांगलीतील आमदार विश्वजीत कदम कार अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. पुण्यामध्ये कदम यांच्या गाडीला मोठा अपघात (Vishwajeet Kadam Car Accident Pune) झाल्याची माहिती आहे. विश्वजीत कदम हे काँग्रेसचे दिवंगत नेते पंतगराव कदम यांचे पुत्र आहेत.

विश्वजीत कदम यांच्या गाडीला काल रात्री पुण्यात मोठा अपघात झाला. सुदैवाने विश्वजीत कदम अपघातातून बालंबाल बचावले. अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र विश्वजीत कदम यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. अपघातानंतर विश्वजीत कदम कराडच्या दिशेने निघाले.

सांगलीतील पलुस कडेगाव मतदारसंघातून विश्वजीत कदम पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते यांचा पराभव केला.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही : संजय राऊत

विश्वजीत कदम यांनी राज्यात दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा विक्रम केला आहे. 1 लाख 62 हजार 521 इतकं मताधिक्य मिळवून कदम यांनी विजय मिळवला आहे.

विशेष म्हणजे या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मतं कोणत्याही उमेदवाराला पडलेली नाहीत. ‘नोटा’ला मतदारांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं दिली आहेत. शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते हे 8 हजार 976 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

Vishwajeet Kadam Car Accident Pune

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *