वॉल्व्हमध्ये बिघाड, पुण्यातल्या रस्त्यावर गुडघाभर पाणी

पुणे : एकीकडे पुण्यात पाणी कपात सुरु आहे. तर दुसरीकडे शहरात लाखो लिटर पाणी वाया गेलंय. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा वॉटर वॉल्व्ह बिघडल्याने हे पाणी वाया गेलं. सकाळी साडे सहा वाजता पुण्यातील रस्त्यांवर तब्बल दोन तास हे पाणी वाहत होतं. काही ठिकाणी चार फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. धरणातील पाण्यावरून महापालिका आणि जलसंपदा विभागात वाद सुरू आहे. …

वॉल्व्हमध्ये बिघाड, पुण्यातल्या रस्त्यावर गुडघाभर पाणी

पुणे : एकीकडे पुण्यात पाणी कपात सुरु आहे. तर दुसरीकडे शहरात लाखो लिटर पाणी वाया गेलंय. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा वॉटर वॉल्व्ह बिघडल्याने हे पाणी वाया गेलं. सकाळी साडे सहा वाजता पुण्यातील रस्त्यांवर तब्बल दोन तास हे पाणी वाहत होतं. काही ठिकाणी चार फुटांपर्यंत पाणी साचलं होतं.

धरणातील पाण्यावरून महापालिका आणि जलसंपदा विभागात वाद सुरू आहे. पुण्यात पाणी कपातीचं संकट आहे. त्यातच हे पाणी वाया गेल्याने संताप व्यक्त केला जातोय.

गुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याने सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वतीपर्यंत येणाऱ्या सुमारे 1600 मीमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह बंद करण्यात येत होता. मात्र, त्यात अचानक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी काही कळण्याच्या आताच रस्त्यावर आलं. पू. ल देशपांडे उद्यानाच्या समोर हे पाणी रस्त्यावर आलं. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच कसरत झाली.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *