बारामतीही आम्हीच जिंकणार, चंद्रकांत पाटलांचा दावा

पुणे : बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व 10 जागा आम्हीच जिंकणार असल्याचा दावा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी खास बातचीत करत होते. पश्चिम महाराष्ट्रातील त्या प्रत्येक ठिकाणी आपण स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. मोदींकडे देशाच्या विकासाच्या मुद्दे असल्याचे सांगत चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळे यांच्या …

बारामतीही आम्हीच जिंकणार, चंद्रकांत पाटलांचा दावा

पुणे : बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व 10 जागा आम्हीच जिंकणार असल्याचा दावा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी खास बातचीत करत होते. पश्चिम महाराष्ट्रातील त्या प्रत्येक ठिकाणी आपण स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.

मोदींकडे देशाच्या विकासाच्या मुद्दे असल्याचे सांगत चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्धा येथील आपल्या प्रचार सभेत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदींवर टीका करत व्यक्तिगत टीका करण्याऐवजी मोदींनी देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलावे ,असे सडेतोड उत्तर दिले होते. तसेच पवारांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही हे मोदींना माहिती असल्यानेच त्यांनी तशी टीका केल्याचा चिमटाही सुळे यांनी काढला.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांनाही लक्ष्य केले. अजित पवारांच्या जलसिंचन घोटाळ्यासंदर्भातील  न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमच्याकडून सर्व गोष्टी पार पाडण्यात आल्या आहेत. आता निकाल कधी येतो याची वाट पाहतो आहे, असा सूचक इशारा पाटील यांनी दिला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *