Zodiac | रखडलेली कामं पूर्ण होणार, हातात पैसा खेळणार , 16 डिसेंबर ते 29 डिसेंबर हा काळ या 4 राशींसाठी सुख घेऊन येणार

Zodiac | रखडलेली कामं पूर्ण होणार, हातात पैसा खेळणार , 16 डिसेंबर ते 29 डिसेंबर हा काळ या 4 राशींसाठी सुख घेऊन येणार
Zodiac

ज्योतिषशास्त्रानुसार आपले आयुष्य ग्रहताऱ्यांभोवती फिरत असते. ग्रह तारांचे अंतर बदलले तर की आपले नशीब बदलते असे मानले जाते. सध्या ब्रम्हांडामध्ये बुधादित्य योग निर्माण होणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Dec 14, 2021 | 12:12 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार आपले आयुष्य ग्रहताऱ्यांभोवती फिरत असते. ग्रह तारांचे अंतर बदलले तर की आपले नशीब बदलते असे मानले जाते. सध्या ब्रम्हांडामध्ये बुधादित्य योग निर्माण होणार आहे.

जेव्हा एकाच राशीमध्ये अनेक वेळा एकापेक्षा जास्त ग्रहांची जुळणी होते आणि त्यामध्ये सूर्य आणि बुध हे ग्रह असतात तेव्हा त्याला बुधादित्य योग असं म्हणतात. येत्या 10 डिसेंबरपासून बुध धनु राशीत भ्रमण करत असून 16 डिसेंबरला सूर्यदेवही धनु राशीत प्रवेश करेल. धनु राशीमध्ये सूर्य आणि बुध या दोन्ही ग्रहांच्या उपस्थितीने बुधादित्य योग तयार होईल. हा योग २९ डिसेंबरपर्यंत राहणार आहे.

या योगाचा परिणाम राशिचक्रातील 4 राशींवर त्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग अनेक प्रकारे चांगला सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांना या दिवसात अधीक संपत्ती मिळू शकेल. त्याच प्रमाणे कामाठिकाणी या राशींच्या लोकांची प्रशंसा केली जाईल. तुमच्या कामामुळेच तुम्ही कोणाचेही मन जिंकू शकाल. या राशीच्या लोकांना या दरम्यान त्यांना हवे ते सहज मिळू शकते. कुटुंबात आनंद राहील आणि प्रियजनांचे पूर्ण सहकार्य मिळेल. रखडलेली कामेही करता येतील.

Cancerकर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ उत्तम मानला जाणार आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर यश मिळण्याची सर्व शक्यता आहे. या काळात तुमचे लव्ह लाईफ चांगले राहील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. पैसे मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेचे कौतुक होईल आणि काही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

Leoसिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ पैशाच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. कामाचे कौतुक होईल आणि नोकरीच्या बाबतीत चांगली ऑफर येऊ शकते. प्रमोशनही होऊ शकते. या दरम्यान मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. तुमच्या उत्पन्नातही अचानक वाढ होऊ शकते. जे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ लाभाच्या दृष्टीने अनुकूल आहे. हा काळ तुम्हाला वर्षभराची कसर भरुन काढणारा काळ ठरणार आहे.

Sagittariusधनु

धनु राशीचे लोक नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. यावेळी त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्ही तुमच्या स्वतःच्या संस्थेतही प्रमोशन मिळवू शकता. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होऊ शकते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या

Parad Shivling | पारद शिवलिंग म्हणजे काय ? जाणून घ्या त्याची पूजा कशी करावी

14 December 2021 Panchang | मंगळवारी काय होणार? कसा जाणार दिवस जाणून घ्या

Chanakya Niti | प्रत्येक जण फसवून जातोय? मित्र ओळखताना गफलत होतेय, मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी विचारात घ्या


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें