Trigrahi Yoga Zodiac | फक्त 10 दिवस थांबा या 3 राशींना असतील त्रिग्रही योग, नशिबाचे दरवाजे उघडे होतील

Trigrahi Yoga Zodiac | फक्त 10 दिवस थांबा या 3 राशींना असतील त्रिग्रही योग, नशिबाचे दरवाजे उघडे होतील
Yoga Zodiac

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. काही राशींसाठी ही स्थिती फायदेशीर ठरते, तर काहींना अडचणींचा सामना करावा लागतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 25, 2022 | 11:46 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. काही राशींसाठी ही स्थिती फायदेशीर ठरते, तर काहींना अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या बुध मकर राशीत आहे, सूर्य आणि शनिची संयोग असून ती 3 फेब्रुवारी 2022 पर्यंत राहील. ग्रहांच्या या संयोगाचा प्रभाव सर्वाधिक 3 राशींवर राहील.चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशीवर काय परिणाम होईल.

वृषभ (Vrushabh Rashi)
या राशीच्या लोकांसाठी ग्रहांच एकत्र येणं फायदेशीर ठरेल. या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या राशीचा शासक ग्रह शुक्र आहे. शुक्र आणि शनि यांच्यात मैत्री आहे. अशा स्थितीत शनीची विशेष कृपाही प्राप्त होईल. या दरम्यान नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग लाभदायक ठरेल. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. कन्या ही बुध ग्रहाची राशी आहे. सूर्याचा बुधाशी चांगला संबंध आहे. त्यामुळे करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. याशिवाय दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल.

तुळ (Libra Rashi)
तूळ राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फलदायी ठरेल. कारण तूळ राशीचा शासक ग्रह शुक्र आहे. शुक्र आणि शनि यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्रिग्रही योगाच्या प्रभावामुळे नोकरीत बदलाची संधी मिळेल. याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Kalashtami 2022 | वर्षाची पहिली कालाष्टमी, काय आहे पूजेची विधी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

25 January 2022 Panchang | 25 जानेवारी 2022, मंगळवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Chanakya Niti | आयुष्यात कोणाला पैसे देताना आचार्य चाणक्यांनी सांगितलेली फक्त 1 गोष्ट लक्षात ठेवा, पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें