Video: शिफ्ट सुरु असताना लेडी डॉक्टर्सचा जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिला का?

Video: शिफ्ट सुरु असताना लेडी डॉक्टर्सचा जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिला का?
महिला डॉक्टर्सचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या महिला डॉक्टरांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये महिला डॉक्टर शिफ्ट सुरु असताना डान्स करताना दिसत आहेत. lady doctor social media video viral

Yuvraj Jadhav

|

Feb 28, 2021 | 6:02 PM

मंगळुरु: इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे नागरिकांना त्यांचे आनंदी क्षण साजरे करण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी उपलब्ध झाल्यानं अनेक जण यावर व्हिडीओ शेअर करतात. इंटरनेट आणि सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ते व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांच्या आनंदाला पारावार राहात नाही. सध्या कर्नाटक राज्यातील मंगळुरु शहरातील महिला डॉक्टर्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर लोक त्या व्हिडीओला पसंत करत आहेत. (Mangalore lady doctor dance celebrating their happiness video viral on social media)

महिला डॉक्टरांचं सेलिब्रेशन

सोशल मीडियावर महिला डॉक्टर्सच्या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ डॉ. नीलाश्मा सिंघळ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. महिला डॉक्टर्स जस्टिन टिम्बरलेकच्या सेक्सी बॅक गाण्यावर डान्स करताना दिसून येतात. व्हिडीओमध्ये नीलाश्मा सिंघल यांच्यासोबत त्यांच्या महिला सहकारी डान्स करताना दिसतात. डॉक्टर्सच्या गळ्यामध्ये स्टेथोस्कोप लावलेला दिसतो. सर्व महिला डॉक्टर्स त्या व्हिडीओमध्ये आनंदी दिसत आहेत. हा व्हिडीओ तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर, 1 लाख 75 पेक्षा अधिक जणांनी लाईक केले आहे.

व्हायरल व्हिडीओ

9 दिवसात 130 प्रसुती

डॉ.नीलाश्मा सिंघल यांनी व्हिडीओ शेअर करताना माय टॅलेंटेड इंटर्न्स आणि मेरी प्यारी ज्युनिअर्स असं म्हटलं आहे. सिंघल यांच्यासोबत दोन ज्युनिअर डॉक्टर आणि तीन इंटर्न्स डान्स करताना दिसतात. सिंघल आणि त्यांच्या टीमनं गेल्या 9 दिवसात 130 प्रसुती केल्या आहेत.

संबंधित बातम्या

Fact Check : येत्या 1 मार्चपासून कोरोनाच्या लसीसाठी खरंच 500 रुपये मोजावे लागतील?

माणिकराव ठाकरेंचा पराभव, क्रीडामंत्र्यांना हरवलं, खडसेंविरोधातही पंगा, संजय राठोडांची वादळी कारकीर्द

(Mangalore lady doctor dance celebrating their happiness video viral on social media)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें