लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, थेट कंपनी स्थापन करत 22 जणांना नोकरी, महिन्याला 25 लाखांची उलाढाल करणाऱ्या उद्योजकाची कहाणी

प्रशांत श्रीवास्तव यांनी ऑप्टिकल कंपनी स्थापन करुन 22 जणांना नोकरी दिली त्यांना दरमहा सव्वा लाखाचा फायदा होत आहे. (Prashant Shrivastava Optical Point)

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, थेट कंपनी स्थापन करत 22 जणांना नोकरी, महिन्याला 25 लाखांची उलाढाल करणाऱ्या उद्योजकाची कहाणी

लखनऊ: कोरोना काळात अनेकांना बेरोजगार व्हावं लागलं. अनेकांनी नोकऱ्या गमवाव्या लागल्यानंतर कोरोनामुळंन निर्माण झालेल्या संकाटांच संधीमध्ये रुपांतर केलं. उत्तर प्रदेशातील प्रशांत श्रीवास्तव यांना 16 वर्षांची नोकरी गमवावी लागली. प्रशांत श्रीवास्तव यांनी लखनऊ जवळील फैजाबादमध्ये त्यांच्या घरामध्ये ऑप्टिकल कंपनी म्हणजेच चष्मा निर्मिती सुरु केली. प्रशांत यांच्या कंपनीला आता 6 महिने झाले असून ते प्रत्येक महिन्याला सव्वा लाख रुपयांचा फायदा मिळवत आहेत. उत्तर प्रदेशातील 6 शहरांमध्ये प्रशांत श्रीवास्तव यांच्या ऑप्टिकल कंपनीची ऑऊटलेट सुरु झाली आहेत. 2025 पर्यंत देशातील प्रत्येक शहरात कंपनीची शाखा स्थापन करण्याचा श्रीवास्तव यांचा निर्धार आहे. प्रशांत श्रीवास्तव यांच्या कंपनीत 22 व्यक्ती काम करत आहेत. (Prashant Shrivastava started optical company and get profit of one lakh per month)

50 हजार पगाराची नोकरी गमावली

प्रशांत श्रीवास्तव हे महाराजगंज जिल्ह्यातील मात्र कामासाठी लखनऊला आले होते. शहरात आल्यानंतर त्यांनी ऑप्टिकल कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. तब्बल 16 वर्ष काम केल्यानंतर प्रशांत श्रीवास्तव यांना लॉकडाऊनमुळं नोकरी गमवावी लागली. तिथे त्यांना 50 हजार पगार मिळत होता. नोकरी गेल्यानंतर स्वत:चा व्यवसाय करण्याचा विचार श्रीवास्तव यांच्या मनात आला.

10 हजारात हर्बल कंपनी सुरू केली अन्… तिची कहानी वाचाच!

वडिलांनी फंडाची रक्कम दिली तर पत्नीनं साठवलेले पैसे दिले

प्रशांत श्रीवास्तव यांनी नोकरी गेल्यानंतर डेअरी ते शेती अशा बऱ्याच प्रकारचे व्यवसाय करण्याचा विचार केला. मात्र, मुलांच्या शिक्षणाचा विचार करुन प्रशांत श्रीवास्तव यांनी शहरातच काही तरी करण्याचं ठरवलं. प्रशांत यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये नोकरी गमवावी लागली होती. ते इतर ठिकाणी नोकरी करत होते. प्रशांत श्रीवास्तव यांनी त्यांच्यासह ऑप्टिकल कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी लागणाऱ्या पैशाची अडचण प्रशांत यांच्यासमोर होती. त्यांचे वडिल दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते. ओम प्रकाश लाल श्रीवास्तव यांनी त्यांना मिळालेल्या फंडाची रक्कम मुलाच्या कंपनीसाठी देण्याचा निर्णय घेतला. प्रशांत यांनी त्यांच्याकडील मुदत ठेवी, पत्नीनं साठवलेले पैसे आणि काही रक्कम दुसऱ्यांकडून घेऊन कंपनी सुरु केली.

जुन्या सहकाऱ्यांनी विश्वास सार्थ ठरवला

प्रशांत यांच्या नेतृत्वात जुन्या ऑप्टिकल कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तींशी त्यांनी सपर्क साधला. त्यांना कंपनीमध्ये काम करण्याची ऑफर दिली. प्रशांत श्रीवास्तव यांच्या कंपनीत त्यांचे जुने 22 सहकारी रुजू झाले. प्रशांत श्रीवास्तव आणि त्यांच्या टीमनं एकमेकांवर विश्वास ठेवून कामाला सुरुवात केली. बघता बघता त्यांच्या कंपनीतील उत्पादनाची विक्री 25 लाखांवर पोहोचली. त्यांना प्रत्येक महिन्याला 1 लाख 25 हजारांचा फायदा होत आहे.

सहा शहरांमध्ये शाखा

प्रशांत श्रीवास्तव यांच्या ऑप्टिकल पॉईंट या कंपनीची सेवा आता उत्तर प्रदेशातील 6 शहरांमध्ये सुरु झाली आहे. श्रीवास्तव यांनी त्यांच्या जून्या संपर्काच्या आधारे डोळ्यांच्या दवाखान्यांमध्ये कंपनीची आऊटलेट सुरु केली.चांगल्या प्रतीचे चष्मे निर्माण करुन ग्राहकांची पसंती मिळवली. या जोरावर त्यांचा देशभरात विस्तार करण्याचा मानस आहे.


संबंधित बातम्या:

फक्त 500 रुपये जमवून ‘या’ योजनेत गुंतवणूक करा; 70 लाखांच्या नफ्यासह मिळणार 1 कोटी रुपये

‘निवडणुकीचं बाळकडू’, दीड महिन्याच्या बाळासह आई अर्ज भरायला केंद्रावर

(Prashant Shrivastava started optical company and get profit of one lakh per month)