रेल्वेचा मोठा निर्णय, आता तिकीट बूक करण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही, पाहा काय आहे योजना

विनाआरक्षित किंवा जनरल तिकीट (General Ticket) खरेदी करायचे असेल तर त्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही. त्यासाठी आता रेल्वेविभागने एक अ‌ॅप उपलब्ध करुन दिले आहे. (railway general ticket online booking mobile app)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:26 PM, 25 Feb 2021
रेल्वेचा मोठा निर्णय, आता तिकीट बूक करण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही, पाहा काय आहे योजना
सांकेतिक फोटो

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केलं जात आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व रेल्वेसेवा (Indian railway) ठप्प होती. मात्र, अनलॉक अंतर्गत रेल्वेसेवा सुरळीत करण्यात आली आहे. रेल्वेसेवा सुरळीत झाल्यामुळे रेल्वेस्थानकांवर प्रवाशांनी गर्दी करणे सुरु केले आहे. त्यातही तिकीट खरेदी करताना रांगेत उभं राहावं लागत असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा नियम सर्रास पायदळी तुडवला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन आता भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय़ घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार विनाआरक्षित किंवा जनरल तिकीट (General Ticket) खरेदी करायचे असेल तर त्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही. त्यासाठी आता रेल्वेविभागने UTS on mobile हे अ‌ॅप पुन्हा एकदा नव्याने उपलब्ध करुन दिले आहे. (railway general ticket online booking uts mobile app information)

अ‌ॅपद्वारे खरेदी करु शकता तिकीट

भारतीय रेल्वेने यूटीएस ऑन मोबाइल अ‌ॅपची (UTS ON MOBILE) सुविधा पुन्हा एकदा सुरु केली आहे. रेल्वे विभागाच्या नव्या निर्णयानुसार आता यूटीएस ऑन मोबाईल या अ‌ॅपवर जनरल तिकीट खरेदी करता येणार आहे. त्यासाठी तिकीट काऊंटरवर जाण्याची गजर नाही. तिकीट काऊंटरवरील गर्दी कमी व्हावी तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जावेत म्हणून ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या अ‌ॅपच्या माध्यमातून जनरल तिकीट ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

UTS ON MOBILE डाऊनलोड कसे करावे?

भारतीय रेल्वे विभागाने UTS ON MOBILE अ‌ॅप उपलब्ध करुन दिले आहे. अ‌ॅण्ड्रॉईड आणि आयओएस या प्रणालीचे फोन वापरणाऱ्यांना हे अ‌ॅप डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी कोणतेही आगावीचे शुल्क लागणार नाही. अ‌ॅपला मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल नंबरच्या मदतीने अ‌ॅपवर अकाऊंट तयार करावे लागेल. तिकीट बूक करायचे असेल तर त्यासाठी फोनमधील जीपीएस सुरु असणे गरजेचे आहे. प्रवासाचे आणि पोहोचण्याचे ठिकाण नोंदवल्यानंतर फोनमध्ये पेमेन्टचा ऑप्शन समोर येईल. ऑनलाईन पद्धतीने पैसे भरल्यानंतर प्रवाशांचे तिकीट बूक झालेले असेल.

दरम्यान, या अ‌ॅपच्या माध्यमातून तिकीट काढल्यानंतर ते ग्राह्य धरले जाणार की नाही, हा प्रश्न पडू शकतो. मात्र, UTS ON MOBILE अ‌ॅपच्या माध्यमातून तिकीट बूक केल्यानंतर कोणी विचाल्यास प्रवासी आपल्या मोबाईलमध्ये बूक केलेल्या तिकिटाला दाखवू शकतात. मोबाईलमध्ये दाखवलेले तिकीट ग्राह्य धरले जाईल.

इतर बातम्या :

RRB NTPC Exam: या शहरातील परीक्षा रद्द, रेल्वे विभागाकडून नोटीस जारी