एकच प्रश्न… घरात भिंतीवर धावणाऱ्या घोड्यांची छायाचित्रे लावतात? वास्तूशास्त्र काय सांगतं?

वास्तुनुसार सात पांढरे घोडे शांततेने वास्तू चालवतात आणि ते समृद्धी आणि सौभाग्य आणू शकतात. तसेच तुमच्या कामकाजावर याचा चांगला परिणाम होतो. आणि काम करण्याची क्षमता देखील वाढते.

एकच प्रश्न... घरात भिंतीवर धावणाऱ्या घोड्यांची छायाचित्रे लावतात? वास्तूशास्त्र काय सांगतं?
Horses Painting Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 1:28 PM

घर बनण्यासाठी घरामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असणे आवश्यक आहे आणि वास्तू सांगते की घरात राहणारी व्यक्ती त्या उर्जेच्या प्रभावाखाली येते. घरातील चांगले स्पंदने आणि वास्तू कला यांच्यातील संबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून आपण वास्तूशास्त्रानुसार घराचे डिझाइन करून घेतो, जेणेकरून घरामध्ये नेहमी आनंद वातावरण व लक्ष्मीची भरभराट होत राहो. वास्तुशास्त्रानुसार घरातील दिशांना खूप महत्व आहे. घरात कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवणे योग्य आहे हे फार महत्वाचं असतं. जर आपण वास्तुनुसार घर बांधले नाही किंव्हा वास्तुनुसार वस्तू योग्य जागी ठेवल्या नाही तर घरात अशांतता निर्माण होते.

आपण पाहतो कि अनेकांच्या घराच्या भिंतीवर सात धावत्या घोड्यांचे छायाचित्र लावलेले असते. आता या सात धावत्या घोड्यांच्या छायाचित्राचे वास्तुशास्त्रात खूप महत्व आहे. वास्तूनुसार सात घोड्यांची छायाचित्र लावणे हे वृद्धी आणि सौभाग्यासाठी खूप शुभ मानले जाते. तसेच वास्तूमध्ये या धावत्या घोड्यांना प्रगती आणि शक्तीचे प्रतीक मानले गेले आहेत. वास्तुनुसार सात हा अंक शुभ मानला जातो. त्यामुळे या सात धावत्या घोड्यांचे छायाचित्र व्यवसायाच्या ठिकाणी अधिक शुभ मानले जाते, यामुळे व्यवसायात प्रगती होते. चला जाणून घेऊया वास्तुनुसार हे चित्र घराच्या कोणत्या दिशेला लावणे योग्य आहे.

– तुम्ही जेव्हा काम करण्यासाठी केबिनमध्ये बसता तेव्हा हे सात घोड्यांचे चित्र अशा प्रकारे भिंतीवर लावा की घोडा जणू आत येत आहे. यामुळे तुमच्या व्यवसायात प्रगती होते आणि पैशांची कमतरता भासत नाही.

-वास्तुनुसार कामाच्या ठिकाणी तसेच घरामध्ये सात धावणाऱ्या घोड्यांचे चित्र पूर्व दिशेला लावल्यास तुमच्या कामकाजावर याचा चांगला परिणाम होतो. आणि काम करण्याची क्षमता देखील वाढते.

– वास्तुशास्त्रानुसार सात धावत्या घोड्यांचे छायाचित्र घराच्या दक्षिण दिशेला लावले तर ते यश आणि यशाचा कारक बनते.

– घरात धावणाऱ्या घोड्याचे चित्र लावण्यापूर्वी हेही लक्षात ठेवा की घोड्यांचे चित्र हे युद्धामध्ये रथ ओढत असलेले नसावे. चित्र अगदी साधे फक्त धावणारे घोडे असावे.

– तसेच घरामध्ये किंवा ऑफिसच्या केबिनमध्ये आक्रमक ७ धावत्या घोड्यांचे चित्र वास्तूनुसार दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते. वास्तुनुसार सात पांढरे घोडे शांततेने वास्तू चालवतात आणि ते समृद्धी आणि सौभाग्य आणू शकतात. म्हणून ७ धावणाऱ्या घोड्यांच्या वास्तू छायाचित्रासाठी पांढरा रंग सर्वात योग्य मानला जातो.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.