Chanakya Neeti : या 4 ठिकाणी चुकूनही जाऊ नका, बरबाद व्हाल, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यापासून व्यक्तीनं नेहमी सावध राहावं असं ते म्हणतात. अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

आर्य चाणक्य यांनी लिहिलेल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवी जीवन, राजकारण, समाजकारण, धन, शिक्षण, आणि माणसाची वर्तणूक या संदर्भात अनेक सिद्धांत सांगण्यात आले आहे. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. एवढंच नाही तर चाणक्य यांनी अशा काही गोष्टी देखील सांगितल्या आहेत, ज्यापासून व्यक्तीने आपल्या आयुष्यात वाचायला हवं. चाणक्य यांनी असे चार ठिकाणं सांगितले आहेत, जिथे जाण्यापासून वाचायला हवं, अन्यथा तुम्ही बरबाद व्हाल, असं चाणक्य निती या ग्रंथामध्ये म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्या बद्दल?
जिथे तुमचा अपमान होईल – चाणक्य म्हणतात जिथे तुम्हाला सन्मान मिळत नाही, वारंवार तुमचा अपमान होतो, त्या ठिकाणी माणसानं कधीही जाऊ नये, कारण जर तुमचा वारंवार अपमान होत असेल तर तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावून बसतात, आणि जो माणूस आपला आत्मविश्वास गमावतो तो आयुष्यात काहीही करू शकत नाही. त्यामुळे नेहमी अशा ठिकाणी जावं जिथे तुमचा योग्य मान-सन्मान होत असेल, तुमच्या कार्याला प्रोहत्साहन मिळत असेल.
जिथे शिक्षण मिळणार नाही – चाणक्य म्हणतात शिक्षण हे मानवाच्या जीवनातील सर्वात मोठं धन आहे, याच शिक्षणाच्या जोरावर तुम्ही चांगला रोजगार मिळू शकता, धन कमवू शकता. आयुष्य सुखात जगू शकता. एकवेळेस तुमच्या जवळ असलेल्या धनाची चोरी होईल, मात्र तुमचं शिक्षण कोणीही चोरी करू शकणार नाही. त्यामुळे जिथे शिक्षण मिळत नाही अशा ठिकाणी चुकूनही जाऊ नये.
जिथे रोजगार नसेल – चाणक्य म्हणतात तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच अशा जागेची निवड करू नका, जिथे रोजगाराच्या संधी कमी असतील अथवा रोजगारच मिळणार नाही. त्यामुळे तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते, तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकतात. त्यामुळे नेहमी अशाच जागेची निवड करा, जिथे रोजगार असेल, तुमचं आयुष्य त्यामुळे समृद्ध होईल.
वाईट संगत – चाणक्य म्हणतात जिथे वाईट संगत असेल, लोक व्यासनाधीन असतील, जुगाराचे अड्डे असतील अशा जागी चुकूनही जाता कामा नये.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
