‘त्या’ नाजूक गोष्टीपासून ते… बायका लपवतात नवऱ्यापासून या 7 गोष्टी?; चाणक्य नीती काय सांगते?
लग्नानंतर पती आणि पत्नीमध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण होतं. या विश्वासावरच त्यांचा संसार टिकून असतो. पुरुष अनेकदा पोटातल्या गोष्टी महिलांना सांगतात. पण महिला कधीच अत्यंत नाजूक गोष्ट नवऱ्याला सांगत नाही. संसार तुटण्याची भीती, नवरा रागावण्याची भीती, नवऱ्याची संशयी वृत्ती वाढण्याची भीती या सर्व गोष्टी या मागे असतात. त्यामुळेच त्या या गोष्टी लपवत असतात.
नवरा बायकोच्या नात्यात पारदर्शीपणा असला पाहिजे असं सांगितलं जातं. असं असेल तर नात्यात गोडवा राहतो. ते नातं टिकतं आणि संसार सुखाचा होतो. त्यासाठी एक दुसऱ्यापासून काहीही लपवता कामा नये. कितीही मोठी गोष्ट असेल ती सांगितली पाहिजे. एखादी चूक जरी झाली असेल तरी ती सांगितली पाहिजे आणि जोडीदारानेही तितक्याच विश्वासाने त्या चुकीला माफी देऊन पुढे गेलं पाहिजे. असं करणं हाच खरा विश्वास असतो. मनाचा मोठेपणा असतो. पण काही लोक हा मोठेपणा दाखवत नाहीत आणि नात्यात कटुता येते. कधी कधी या नात्याचा शेवट अत्यंत करूण होत असतो.
मात्र, आर्य चाणक्याच्या मतानुसार, बायका आपल्या नवऱ्यापासून बरंच काही लपवत असतात. त्याची नवऱ्याला खबरही नसते. अशा गोष्टी सांगताना बायका अत्यंत सफाईदारपणे खोटं बोलतात. दुसरी बाजू पाहता, तसं केल्याने त्यांचं नातं अधिकच घट्टंही होत असतं. नवरा हलक्या कानाचा असेल, संशयी असेल आणि तो समजदार नसेल तर अशा गोष्टी सांगितल्याने नात्यात बिघाड होतो.
नवऱ्यापासून बायका कोणत्या गोष्टी लपवतात?
1. प्रत्येक महिलेचं नवऱ्याशिवाय इतर पुरुषाच्याबाबतीत आकर्षण असतंच. त्यांच्या सिक्रेटला तुम्ही क्रश म्हणूनही पाहू शकता. त्यांना कोणता ना कोणता पुरुष मनातूनच आवडलेला असतो. कदाचित तो शेजारी, कॉलेजचा मित्र किंवा एखादा सेलिब्रिटीही असू शकतो. ती तिचं क्रश नवऱ्याला सांगू शकत नाही. सांगितलं तर दोघांच्या नात्यात कटुता येऊ शकते.
2. पत्नीला नेहमी नवऱ्याचं मन राखण्यासाठी त्याच्या हो ला हो मिळवावी लागते. नवऱ्याच्या निर्णयावर ती खूश असो वा नसो, त्याच्या बोलण्याने तिचं समाधान होवो अथवा न होवो, ती सहमत असो वा नसो, पण ती नेहमी नवऱ्याच्या सूरात सूर मिसळत असते. केवळ नवऱ्यासोबत भांडण होऊ नये, वाद होऊ नये म्हणून ती हे करत असते.
3. रोमान्सवेळी महिला अनेकदा नवऱ्यापासून संतुष्ट झालेल्या नसतात. मात्र, तरीही ती नवऱ्याला समाधानी झाल्याचं खोटं सांगतात. पण वास्तवात त्यांची रोमान्सची इच्छा अपूर्णच राहते. त्यांची रोमान्सबाबतची व्याख्याही वेगळी असते. तीच नवऱ्याकडून पूर्ण होत नाही. पण त्यांना मन मारावं लागतं.
4. बायका कधीच नवऱ्याला त्यांच्या सेव्हिंगची माहिती देत नाही. त्या पैशांची बचत करत असतात. काटकसरीने घर चालवतात. त्या नवऱ्याला या बचतीची माहिती देत नसल्या तरी घरात जेव्हा संकट येतं तेव्हा हाच पैसा वापरून त्या संकटावर मात करतात.
5. बायकांची एक सवय म्हणजे त्या नेहमी त्यांचा आजार लपवतात. नवऱ्याला अधिक खर्च होऊ नये, त्यांनी आपली चिंता करू नये, टेन्शन घेऊ नये म्हणून त्या आजार लपवत असतात.
6. महिलांच्या पोटात काही राहत नाही असं म्हटलं जातं. नवरा अनेकदा बायकोकडे अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. त्या गोष्टी इतरांना सांगायच्या नसतात. पण या गोष्टी ऐकल्यावर बायकांना राहवत नाही. त्या नवऱ्याने सांगितलेल्या गोष्टी इतरांना सांगतात.
7. महिला कधीच तिच्या पूर्वीच्या रिलेशनशीपबाबत नवऱ्याला सांगत नाही. शाळा आणि कॉलेजात किती बॉयफ्रेंड होते, त्यांचं कुणाबरोबर अफेयर आहे का? याची माहिती त्या देत नाहीत. नवऱ्यासोबतचं नातं बिघडण्याची आणि संसार तुटण्याची भीती त्यांना कायम सतावत असते. त्यामुळे त्या कोणत्याही गोष्टीचा थांगपत्ता लागू देत नाही.