AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील वास्तूदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कापूराने करा ‘हे’ खास उपाय

आपल्या हिंदू धर्मात कापूराला खूप महत्त्व आहे. तसेच कापूराचे इतरही अनेक फायदे आहेत जे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. हे उपाय तुम्हाला नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोषांवर मात करण्यास मदत करू शकतात. चला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

घरातील वास्तूदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कापूराने करा 'हे' खास उपाय
| Updated on: Oct 13, 2025 | 11:14 AM
Share

वास्तुशास्त्रात असे मानले जाते की तुमच्या घरात वास्तु तत्वांचे पालन केल्याने तुम्हाला अनेक समस्यांपासून संरक्षण मिळते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आपण प्रत्येकजण आपल्या घरातील वस्तू योग्य दिशेला ठेवत असतो. कारण याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर आपल्या प्रगतीवर होत असतो. अशातच वास्तुशास्त्रात घरातील नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी कापूर हा एक चांगला उपाय म्हणून देखील उल्लेख केला आहे. तर जीवनातील अनेक समस्यांवर मात करण्यासाठी कापूर तुम्हाला कशी मदत करू शकते ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

या ठिकाणी कापूर ठेवा

वास्तुनुसार तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर, देवघरात आणि तिजोरीवर कापूरचा तुकडा ठेवू शकता. शिवाय बेडरूममध्ये कापूर ठेवल्याने घरगुती त्रास कमी होण्यास मदत होते. उशीखाली कापूर ठेवून झोपल्याने मनःशांती मिळते आणि गाढ झोप येते. तर अशा काही ठिकाणी कापूर ठेवल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक उर्जेपासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते.

कापूराचे हे उपाय दररोज करा

एखादी वाईट गोष्ट वारंवार होत असेल तर ती तुमच्या घरात नकारात्मक उर्जा असल्यामुळे घडत असते. अशा परिस्थितीत तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळला पाहिजे. यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढेल. तसेच अनेकदा आपण देवघरात आरती केल्यानंतर जेव्हा प्रसन्न वाटते तेव्हा त्यांचे कारण म्हणजे आरती करताना जाळलेला कापूर घरात सकारात्मकता आणतो.

याव्यतिरिक्त, तुमच्या समस्या सुधारण्यास सुरुवात होईल. जर तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील तर तुम्ही लवंगासह कापूर जाळला पाहिजे. यामुळे तुमची ही समस्या देखील दूर होते.

वास्तुदोषांपासून मुक्तता मिळवा

तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्ही कापूर असलेले काही उपाय करून पाहू शकता. हे करण्यासाठी, घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात कापूरचे तुकडे ठेवा. काही दिवसांनी हे कापूर विरघळून जातील त्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा नवीन कापूर ठेवा. असे केल्याने तुम्हाला वास्तुदोष दूर होण्यास मदत होऊ शकते व घरात सुख शांती समृद्धी आणि प्रसन्न वातावरण तुम्हाला अनुभवायला मिळते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

RSS स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!
RSS स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!.
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम.
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्...
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्....
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात.
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले.
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन.
..नाईलाजास्तव वजाबाकी करावी लागेल, दादांकडून रूपाली पाटलांची कानउघाडणी
..नाईलाजास्तव वजाबाकी करावी लागेल, दादांकडून रूपाली पाटलांची कानउघाडणी.
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप.
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले...
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले....
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव.