मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत पहिली ट्रेन अयोध्येला रवाना
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या जळगाव जिल्ह्यातील 800 यात्रेकरूंची पहिली ट्रेन अयोध्येच्या दिशेने आज रवाना झाली. राज्यात आज मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा शुभारंभ झाला.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या जळगाव जिल्ह्यातील 800 यात्रेकरूंची पहिली ट्रेन अयोध्येच्या दिशेने आज रवाना झाली. राज्यात आज मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा शुभारंभ झाला असून राम मंदिर दर्शनासाछी जळगाव जिल्ह्यातील 800 भाविकांची पहिली ट्रीप आज अयोध्येला रवाना झाली. जळगाव स्थानकातून रेल्वेने अयोध्येच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी खासदार स्मिता वाघ यांच्यासह आमदार व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हिरवा झेंडे दाखवण्यात आला.
ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत प्रचंड उत्साहात रेल्वेने अयोध्येच्या दिशेने प्रस्थान केले. विशेष म्हणजे या ठिकाणी विशेष देखावा साकारण्यात आला होता. तसेच आदिवासी नृत्यसुद्धा या ठिकाणी सादर करण्यात आले. सर्व्त आनंदाचे वातावरण होते. अयोध्येच्या दिशेने जाणारी ही रेल्वे आजा फुग्यांनी, तसेच झेंडूच्या माळांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती. 30 सप्टेंबर निघालेली ही ट्रेन, उद्या 1 ऑक्टोबर रोजी अयोध्या येथे पोहचेल. दोन दिवस तेथे मुक्काम केल्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी ही यात्रा परत जळगाव येथे परतणार आहे. यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी अयोध्येला जाणाऱ्या भाविकांशी रेल्वेतील सोयी सुविधांबद्दल बातचीत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
आमचं भाग्य समजतो, रामाने आम्हाला दर्शनासाठी बोलवलं आहे. आज आम्ही दर्शनाला जात असल्याचा मोठा आनंद होत आहे, अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे. जळगांव जिल्हयातून एकुण 1177 अर्ज पात्र ठरले होते, सदर पात्र ठरलेल्या अर्जामधून लॉटरी सोडतीव्दारे निरीक्षकांच्या उपस्थित इन-कॅमेरा 761 लाभार्थ्याची निवड करण्यात आली. निवड झालेल्या लाभार्थ्याचे जोडीदार (पती / पत्नी) असे 35 लाभार्थी व 12 सहायक असे एकुण 808 लाभार्थ्याची श्रीराम मंदिर, अयोध्या येथे जाण्यासाठी निवड करण्यात आली आहे.