
वैदिक कॅलेंडरनुसा आश्विन महिन्यात 6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या शुभ प्रसंगी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि जीवनात आनंद येतो. हा दिवस खूप खास मानला जातो. तसेच या कोजागिरी पौर्णिमेला खीर बनवण्याची परंपरा आहे. ही खीर रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवली जाते. तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
यासोबतच कोजागिरी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी शिवलिंगावर या विशेष गोष्टींने अभिषेक केल्याने समस्या दूर होण्यास मदत होते आणि भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात. कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी कोणत्या गोष्टीं अर्पण कराव्यात ते आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात.
शिवलिंगाला या वस्तू अर्पण करा
भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला सकाळी स्नान केल्यानंतर शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करा. नंतर केशर अर्पण करा. महादेव मंत्रांचा जप करा. धार्मिक श्रद्धेनुसार या प्रथेमुळे व्यक्तीचा सन्मान आणि आदर वाढतो. शिवाय भगवान शंकर यांच्या कृपेने जीवनातील सर्व दुःख दूर होतात.
आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तुम्ही या कोजगिरी पौर्णिमेला शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करा. तुमच्या जीवनात सुख आणि शांतीसाठी परमेश्वराची प्रार्थना करा. असे मानले जाते की या उपायाने आर्थिक अडचणी कमी होतात आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते.
तुमच्या जीवनात आनंद आणि शांती मिळविण्यासाठी कोजगिरी पौर्णिमेला पूजा करताना शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करा आणि प्रभूच्या नावाचे ध्यान करा. धार्मिक श्रद्धेनुसार ही प्रथा भगवान शिवांना प्रसन्न करते आणि तुमच्या जीवनात आनंद आणि शांती आणते.
तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामांना व प्रयत्नांमध्ये यश मिळविण्यासाठी शिवलिंगावर दूध, दही आणि मध यांचा अभिषेक करणे शुभ मानले जाते. अभिषेक केल्यानंतर शिव चालीसाचे वाचन करा. असे मानले जाते की या गोष्टींनी अभिषेक केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतात आणि कामाधंद्यात यश मिळते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)