Rose Day: आज ‘रोज डे’च्या दिवशी करा हे सोपे उपाय, नात्याला येईल बहार

नितीश गाडगे,  Tv9 मराठी

|

Updated on: Feb 07, 2023 | 3:01 PM

वास्तविक लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. 'रोज डे'च्या (Rose Day) दिवशी तुम्ही लालं गुलाबाने काही खास उपाय करू शकता. या उपायाने तुमच्या प्रेमसंबंधात गोडवा येईल

Rose Day: आज 'रोज डे'च्या दिवशी करा हे सोपे उपाय, नात्याला येईल बहार
रोज डे
Image Credit source: Social Media

मुंबई, आजपासून म्हणजेच मंगळवारपासून व्हॅलेंटाइन वीक (Valentine week)  सुरू झाला आहे. प्रेम करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत प्रेमवीरांसाठी पर्वणी आहे. या दरम्यान, अनेक लोकं आपल्या प्रेयसीला आपल्या मनातील भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. व्हॅलेंटाइन डेच्या पहिल्या दिवशी ‘रोज डे’ साजरा केला जातो, ज्यामध्ये प्रेमी युगूल एकमेकांना लाल गुलाब देतात. वास्तविक लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. ‘रोज डे’च्या (Rose Day) दिवशी तुम्ही लालं गुलाबाने काही खास उपाय करू शकता. या उपायाने तुमच्या प्रेमसंबंधात गोडवा येईल, तसेच तुमच्या प्रेमविवाहात येणारे सर्व अडथळेही दूर होतील. चला तर मग जाणून घेऊया लाल गुलाबाचे उपाय.

‘रोज डे’च्या दिवशी हे उपाय करा

  1. भगवान भोलेनाथ हे अत्यंत दयाळू मानले जातात. अशा वेळी लाल गुलाब घेऊन महादेवाच्या चरणी नतमस्तक व्हा. तुमच्या प्रेमाची साथ नक्कीच मिळेल. सोमवारी आणि प्रदोष व्रत भगवान शंकराला लाल गुलाब अर्पण केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात.
  2. याशिवाय शिवलिंगावर लाल गुलाब अर्पण करून तेथून उचलून आपल्याजवळ ठेवावे. या उपायाने तुम्हाला खरे प्रेम नक्कीच मिळेल.
  3. मंगळवारी हनुमानजींना 11 गुलाब अर्पण करा. असे केल्याने बजरंगबली तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल.
  4. मंगळवारी कागदावर तुमच्या जिवलग व्याक्तीचे नाव लिहा आणि बजरंगबलीसमोर हात जोडून प्रार्थना करा. यानंतर, त्याच्या चरणी गुलाब अर्पण करा आणि कागद आपल्याजवळ ठेवा. असे केल्याने तुम्हाला अपेक्षित प्रेम मिळेल.
  5. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी आणि प्रेमाने भरलेले असावे असे वाटत असेल तर रोज काचेच्या भांड्यात स्वच्छ पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका. यामुळे जोडप्याच्या नात्यात गोडवा येतो.
  6. जर तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर कोणत्याही शुक्रवारी संध्याकाळी गुलाबाच्या फुलात कापूरचा तुकडा जाळून टाका आणि कापूर जाळल्यानंतर ते फूल देवी लक्ष्मीला अर्पण करा. असं केल्याने धनाची प्राप्ती होईल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील.
  7.  तुमची तिजोरी नेहमी धन-धान्याने भरलेली असावी असं वाटत असेल तर मंगळवारी लाल चंदन, लाल गुलाब आणि रोळी घेऊन या सर्व वस्तू लाल कपड्यात बांधून ठेवा. हनुमानजींच्या समोर मंदिरात किंवा घरातील हनुमानजींच्या मूर्तीसमोर 1 आठवडा ठेवा आणि 1 आठवड्यानंतर ही पोटली आपल्या घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरीत ठेवा. असं केल्याने तुम्हाला पैसे मिळतील आणि तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील.
  8. जर तुमच्यावर मोठं कर्ज असेल आणि तुम्हाला त्यातून सुटका हवी असेल तर 5 लाल गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि नंतर चार गुलाब एका पांढऱ्या कापडाच्या चार कोपऱ्यात बांधा. यानंतर या कापडाच्या मध्यभागी पाचवे फूल बांधावे. त्याचा एक बंडल बनवा आणि वाहत्या नदीत वाहू द्या. गुलाबाची ही युक्ती केल्याने कर्जातून मुक्ती होईल आणि तुमच्या घरात सुख-समृद्धीही नांदेल.
  9.  सुपारीच्या पानात सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवाव्यात आणि दुर्गादेवीला अर्पण कराव्यात. या उपायाने तुम्ही कुंडलीतील अनेक दोष दूर करू शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI