कार्तिक महिना 2025: कार्तिक महिन्यात केस आणि नखे कापावीत का?
धार्मिक प्रथांनुसार कार्तिक महिन्याचे काही विशेष नियम आहेत. कार्तिक महिन्यात केस आणि नखे कापावीत की नाही असा प्रश्न लोकांना पडतो. तर आपण आजच्या लेखात या प्रश्नाचे उत्तर तसेच या महिन्यात काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊयात.

सनातन परंपरेत तसेच अनेक संस्कृती आणि धार्मिक प्रथांनुसार कार्तिक महिना खूप महत्वाचा आणि विशेष मानला जातो. मराठी पंचांगानुसार कार्तिक महिना हा वर्षाचा आठवा महिना आहे. तर या कार्तिक महिन्यात भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. त्यामुळे हा महिना खूप पवित्र मानला जातो. या वर्षी कार्तिक महिना 8 ऑक्टोबर रोजी सुरू होतो. या महिन्यात भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
तुम्ही जेव्हा मनोभावे भगवान विष्णू आणि लक्ष्मीदेवीची पूजा करतात तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व त्रासांपासून तुम्हाला मुक्तता मिळते. तसेच या श्रद्धेने समृद्धी आणि शांती देखील मिळते. सर्व इच्छा पूर्ण होतात. मात्र कार्तिक महिन्यासाठी काही विशेष नियम आपल्या हिंदू धर्मात सांगितले आहेत. त्यात कार्तिक महिन्यात केस आणि नखे कापावीत की नाही असा प्रश्न आपल्यापैकी अनेक लोकांना पडतो. तर आजच्या या लेखात आपण या प्रश्नाचे उत्तर तसेच या महिन्यात काय करावे आणि काय करू नये हे देखील जाणून घेऊयात.
केस आणि नखे कापू नयेत
हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार, कार्तिक महिन्यात केस कापू नयेत. या महिन्यात नखे देखील कापू नये. शिवाय या महिन्यात मांसाहाराचे सेवन करू नये. त्याबरोबर झाडेही तोडू नयेत. तुम्ही या गोष्टींचे पालन करणे महत्वाचे आहे. कार्तिक महिन्यात या गोष्टी चुकून केल्या तर तुम्ही केलेली प्रार्थना आणि पुजा पाठ निरर्थक ठरतात आणि त्यांचे फळ मिळत नाही.
कार्तिक महिन्यात काय करू नये?
कार्तिक महिन्यात शरीराला तेल लावू नये अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी (नरक चतुर्दशी) रोजी तेल लावावे. यासाठी कार्तिक महिन्यात शरीराला तेल न लावण्याचा प्रयत्न करावा. तर या महिन्यात मांसाहारसोबतच, उडीद डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, चणाडाळ, वाटाणे आणि मद्य सेवन करू नये. या महिन्यात वांगी आणि कारल्याचे सेवन देखील टाळावे.
कार्तिक महिन्यात काय करावे?
कार्तिक महिन्यात गरजूंना दान करावे. या महिन्यात तुळशीला खूप महत्त्व दिले जाते. तसेच संपूर्ण कार्तिक महिन्यात नियमितपणे तुळशीसमोर दिवा लावल्याने शुभ फळे मिळतात. या महिन्यात दिवे दान करावेत आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
