शनिचरी अमावस्येच्या दिवशी होणार वर्षाचे पहिले सूर्य ‘ग्रहण’, जाणून घ्या कोणत्या राशीवर होणार परिणाम

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिना खूप खास मानला जातो. या महिन्यात सर्व 9 ग्रहांची राशी बदलणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच 30 एप्रिलला वर्षातील पहिले सूर्यग्रहण देखील होणार आहे.

शनिचरी अमावस्येच्या दिवशी होणार वर्षाचे पहिले सूर्य 'ग्रहण', जाणून घ्या कोणत्या राशीवर होणार परिणाम
solar eclipse
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 11:27 AM

मुंबई :  हिंदू (Hindu) धर्मामध्ये सूर्यग्रहणाला (Surya Grahan 2022) विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण एक महत्त्वाची घटना आहे. पुराणानुसार सूर्यग्रहणाच्या काळात कोणते ही शुभ कार्य केले जात नाही.दरवर्षीप्रमाणे 2022 मध्येही ग्रहण होणार आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. ही चंद्र (Moon) व सूर्य यांची युती असते. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. या आविष्काराला सूर्यग्रहण म्हणतात. 2022 मध्ये एप्रिल महिन्यात पहिले सूर्यग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिना खूप खास मानला जातो. या महिन्यात सर्व 9 ग्रहांची राशी बदलणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच 30 एप्रिलला वर्षातील पहिले सूर्यग्रहण देखील होणार आहे.

  1. मेष – सूर्यग्रहणामुळे मेष राशीच्या लोकांसाठी धनहानी होऊ शकते. या दिवशी व्यवहार करणे टाळावे. संपत्ती संबंधी कोणत्याही गोष्टी करु नये.
  2. वृषभ – सूर्यग्रहणाचा वृषभ राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासावर वाईट परिणाम होईल. तुम्ही तणावाचेही बळी होऊ शकता. मानसिक शांतात महत्त्वाची आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात जप आणि योगा करा.
  3. मिथुन – मिथुन राशीच्या लोकांनी या काळात स्वत:ची काळजी घ्या अन्यथा नुकसान होऊ शकते. या दिवशी घरीच राहणे किंवा किमान गर्दीच्या ठिकाणी न जाणे चांगले राहील.
  4. कर्क – कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण शुभ आहे. धनलाभ होईल. विवाह निश्चित होऊ शकतो. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील.
  5. सिंह – सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण देखील चांगले आहे. पैसा लाभदायक ठरेल, परंतु अनावश्यक खर्च आणि गुंतवणूक टाळा. या काळात केलेली गुंतवणूक फायदा देणार नाही.
  6. कन्या – कन्या राशीच्या लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही, तरीही संयमाने वेळ काढू नका. करिअरमध्ये बदल करणे टाळा. या काळात शांत राहण्याचा प्रयत्न करा.
  7. तूळ – तूळ राशीच्या लोकांच्या आरोग्यावर सूर्यग्रहणाचा वाईट परिणाम होऊ शकतो. वादविवादांपासून दूर राहा. वाणीवर संयम ठेवा. कोणाशी बोलताना काळजी घ्या.
  8. वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअरसाठी वेळ योग्य राहणार नाही. हा वेळ सहजतेने काढा.
  9. धनु – धनु राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण चांगले राहील. आरोग्य-आर्थिक स्थिती चांगली राहील. शत्रूंवर विजय मिळेल.
  10. मकर – मकर राशीच्या वाईट सवयींपासून दूर राहा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होईल. मुलांची काळजी घ्या. या काळात झोपणे टाळा.
  11. कुंभ – कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण चांगले आहे असे म्हणता येणार नाही. गुंतवणुकीत नुकसान, कुटुंबात वाद, कामात अपयश येऊ शकते. गुंतवणुक टाळाच.
  12. मीन – मीन राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण चांगले राहील. धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळेल. मान-सन्मान वाढेल.

संबंधीत बातम्या :

Sankashti Chaturthi 2022 | अंगारकी चतुर्थी निमित्त ‘दगडूशेठ’ गणपतीला स्वराभिषेक

Chanakya Niti | आयुष्यात यशाचं प्रत्येक शिखर गाठायचंय? मग चाणक्य नीतीनुसार या गोष्टी नक्की करा

Sankashti Chaturthi 2022 | प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गजाननाला आंब्याची आरास

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.