Vastu Tips : देवघरात या चार वस्तू चुकूनही ठेवू नका, ठरतात प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा

हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या चुकूनही देवघरात नसाव्यात, त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्याचे काय परिणाम होतात? त्याबद्दल जाणून घेऊयात.

Vastu Tips : देवघरात या चार वस्तू चुकूनही ठेवू नका, ठरतात प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2025 | 5:18 PM

धर्मशास्त्रामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, तुमच्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी घडतात, किंवा तुमच्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात, त्यामागे तुमच्या घरात असलेला वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतो. त्यामुळेच हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेकदा आपण काही छोट्या -छोट्या चुका करतो, मात्र त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, घरामध्ये नकारात्म ऊर्जा तयार होते, त्याचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर होतो.घरात विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तुमचं घर कसं असावं? तुमच्या घरात कोणत्या वस्तू असाव्यात, कोणत्या नसाव्यात? तुमच्या घरात असलेल्या वस्तुंची दिशा कोणती असावी? अशा प्रत्येक गोष्टींचे नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, तुमच्या देवघरात काही वस्तू नसाव्यात असं वास्तुशास्त्र सांगतं, त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. चला तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल.

देवघरात कधीही खंडित मूर्ती नसावी – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या देवघरात कधीही खंडित मूर्ती किंवा तडा गेलेली देवाची प्रतिमा नसावी. जर तुमच्या घरात अशा प्रकारची एखादी मूर्ती किंवा देवी देवतांची प्रतिमा असेल तर तिला देवघरात न ठेवता तिचं नदीच्या पाण्यामध्ये विसर्जन करावं, असं वास्तुशास्त्र सांगतं. जर घरात खंडित मूर्ती किंवा तडा गेलेली प्रतिमा असेल तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.

देवघरात धारदार वस्तू ठेवू नका – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या देवघरात चुकूनही कोणत्याही प्रकारची धरादार वस्तू ठेवू नका, अशा वस्तुंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वास्तुदोष निर्माण होतो. घरात शांतता राहात नाही. आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

एका पेक्षा अधिक शंख नसावेत – वास्तुशास्त्रानुसार पुजेमध्ये शंखाचं खूप महत्त्व आहे, शंखनादाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते, मात्र देवघरात एकापेक्षा अधिक शंख नसावेत. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.

देवघरात माचिस ठेवू नका – वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही माचिस ठेवू नये, तसेच जळालेली काडी देखील देवघराच्या आसपास टाकू नये, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. घरात शांतता राहत नाही, काही कारण नसताना देखील वादविवात होतात. वास्तुदोषामुळे प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो.

अनेक जण देवघराची साफ सफाई करण्यासाठी वापरण्यात येणारं फडकं देखील देवघरातच ठेवतात, पण अशी चूक करू नका, वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे घर अस्थिर बनतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करण्याचे फायदे

वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. घरात आर्थिक स्थिरता येते. सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत होते, त्याचा पहिणाम हा तुमच्या आरोग्यावर होतो. आरोग्य उत्तम राहते. घरात वादविवाद होत नाहीत, शांतता राहते, असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)