Vastu Tips : तुळशीच्या कुंडीमध्ये फक्त ही एक गोष्ट ठेवा, अन् चमत्कार बघा, घरात येईल पैसाच पैसा
हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे, ज्या घरात तुळस असते त्या घरावर सदैव माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद असतो, आज आपण तुळशी संदर्भात काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला अत्यंत पवित्र मानलं जातं. तुळशीच्या झाडामुळे घरात केवळ सकारात्मक ऊर्जाच येत नाही, तर ज्या घरात तुळशीचं झाड आहे, त्या घरावर कायम लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो. जर तुम्ही तुळशीचं झाडं हे तुमच्या घराच्या मध्यभागी ठेवलं तर त्यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच अशा काही वस्तु आहेत, ज्या वस्तु तुम्ही तुळशीजवळ ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडी अडचणी दूर होतात. दु:खापासून तुम्हाला मुक्ती मिळते. घरात सुख शांती येते, तुमची प्रगती होते. तुळशीच्या झाडाला नियमित पाणी घालणं, तुळशीची पूजा करणं हे केवळ अध्यात्माच्या दृष्टीनेच महत्त्वाचं नाही तर वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होते. वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या तुम्ही तुळशी जवळ ठेवल्यास त्याचा खूपच शुभ प्रभाव हा तुमच्या कुटुंबावर पडतो, अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
शाळीग्राम ठेवा – तुमच्या तुळशीच्या वृंदावनामध्ये शाळीग्राम ठेवा, शाळीग्रामाला भगवान विष्णू यांचं रूप मानलं जातं. भगवान विष्णू यांना तुळस ही अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे सदैव भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो, तुळशीमध्ये शाळीग्राम ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते. जर अनेक दिवसांपासून एखादं काम अडकलेलं असेल तर ते पूर्ण होण्याची शक्यता वाढते. घरामध्ये पैसा टिकून राहतो, तुळशी जवळ शाळीग्राम ठेवल्यास तुम्हाला एक महिन्यानंतर हळूहळू घरामध्ये बदल जाणवायला लागतो, असा देखील दावा धर्मशास्त्रामध्ये करण्यात आला आहे.
हळकुंड – तुम्ही ज्या कुंडीमध्ये तुळस लावली आहे, त्या कुंडीमध्ये हळद ठेवा, त्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. हा उपाय खास करून धन आणि संपत्ती वाढवण्यासाठी केला जातो. तुळशीच्या कुंडीमध्ये हळकुंड ठेवल्यास घरातील वातावरण स्थिर राहतं.
तुळशीला कच्चे दूध अर्पण करा – तुळशीला कच्चे दूध अर्पण केल्यास घरात केवळ सकारात्मक ऊर्जाचं वाढत नाही तर त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळते, मानसिक आरोग्य उत्तम राहते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच तुमचं जर एखादं काम अनेक दिवसांपासून अडलं असेल तर ते देखील पूर्ण होतं.
तुळशी जवळ गोमती चक्र ठेवा – वास्तुशास्त्रामध्ये गोमती चक्राला शुभ आणि शक्तीचं प्रतिक मानलं गेलं आहे. तुळशीजवळ गोमती चक्र ठेवल्यानं तुमच्या घरातील धन संपत्तीमध्ये वाढ होते, असं वास्तुशास्त्र सांगतं. ज्या लोकांना कायमच अडचणी येतात अशा लोकांसाठी हा उपाय खूपच प्रभावी असल्याचं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
