Vedic Numerology: ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांनी काही विशेष उपाय केल्यास आयुष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत..!
Vedic Numerology for Mulank 9: अंकशास्त्रातच्या मते, 9 हा आकडा भगवान हनुमान आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 9 असतो. या तारखेला जन्मलेल्या लोकांवर मंगळाच्या शुभ प्रभावामुळे त्यांचा स्वभाव निर्भय असतात. चला तर जाणून घेऊया 9 मुलांक असलेल्या लोकांनी मंगळवारी काय उपाय केले पाहिजेल.

अंकशास्त्रानुसार, तुमची जन्मतारिख तुमच्या कुंडलीतील ग्रहाशी संबंधित असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, लोकांच्या जन्माची तारिख सर्व लोकांच्या आयुष्यावर विशेष प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे 9 हा अंक हनुमानजींशी संबंधित मानला जातो. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांची जन्म तारिख 9,18 किंवा 27 असते म्हणजेच त्याचे मुलांख 9 असते. अशा लोकांचा संबंध हनुमानजींशी मानला जातो. मुलांख 9 असलेल्या लोकांनी नियमित हनुमानाची पूजा केल्यामुळे आणि हनुमान चालिसाचे पठन केल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच मुलांख 9 असलेल्या लोकांनी मंगळवारी आणि शनिवारी व्रक केल्यामुळे आणि हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होण्यास मदत होते.
9 व्या क्रमांकाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. 9,18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांना नेहमीच भगवान हनुमानाचा आशीर्वाद असतो. संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी केली जाणारी हनुमानाची पूजा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. हनुमानाला मंगळ ग्रहाचे देवता म्हटले जाते. म्हणूनच मंगळवारी हनुमानजींसोबत मंगळाचीही पूजा केली जाते. हनुमान हे मंगळाचे प्रतीक आहे. जर तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात समस्या येत असतील तर तुमच्या कुंजलीतील मंगळ अशुभ किंवा वाईट असल्यामुळे असू शकते.
जर तुमच्या कुंडलीतील मंगळ वाईट असेल तर आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात. कुटुंबातील लोक आजारी पडू शकतात. जर तुमचा मंगळ शुभ असेल तर कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील. मंगळ हा शुभ गोष्टींचा प्रतीक मानला जातो. जे लोक स्वार्थाशिवाय आपले काम करतात त्यांना मंगल आणि हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांना आयुष्यात कधीही संकटांचा सामना करावा लागत नाही. याशिवाय, हनुमानाची आणि मंगळची पूजा केल्यामुळे जीवनातील समस्या दूर राहतात. ज्या लोकांचे हृदय शुद्ध आहे, ते कोणत्याही भेदभावाशिवाय लोकांना मदत करतात आणि निःस्वार्थपणे लोकांची सेवा करतात, त्यांना हनुमानजींचे आशीर्वाद नेहमीच मिळतात. या कारणास्तव, 9 अंक असलेल्या लोकांना मंगळ आणि हनुमानजींचा आशीर्वाद असतो. अंकशास्त्रज्ञ म्हणतात की 9 मुलांक असलेले व्यक्ती निर्भय आणि सहनशील असतात. असे लोक प्रत्येक अडचणीला तोंड देण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी विजयी होतात. जर मंगळ अशुभ असेल तर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यासोबतच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा :
- मंगळवारी चुकूनही मांस, मद्य इत्यादी गोष्टींचे सेवन करू नये.
- हनुमानजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, मंगळवारी भगवान श्री रामाचे ध्यान करा.
- मंगळवारच्या दिवशी श्री रामाच्या नावाचा जप केला पाहिजे.
- मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात परिक्रमा करणे फायदेशीर ठरेल.
- मंगळवारच्या दिवशी माकडाला काहीतरी खाऊ घाला यामुळे तुमच्यावर हनुमानजींचा आशीर्वाद राहातो.