AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI New Rules List : आता खैर नाही, टीम इंडियाच्या खेळाडूंना 10 कठोर नियम पाळावेच लागतील, अन्यथा…

BCCI New Rules List : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खूप खराब प्रदर्शन केलं. त्याशिवाय टीममध्ये अंतर्गत वाद झाल्याच समोर आलं. मीडियामध्ये या बातम्या आल्या. त्यानंतर बीसीसीआयने एक रिव्यु मीटिंग केली. बीसीसीआयने खेळाडूंसाठी 10 कठोर नियम बनवले आहेत. हे नियम मोडणाऱ्यांची आता खैर नसेल.

BCCI New Rules List : आता खैर नाही, टीम इंडियाच्या खेळाडूंना 10 कठोर नियम पाळावेच लागतील, अन्यथा...
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Jan 17, 2025 | 9:19 AM
Share

मागच्या काही महिन्यापासून टीम इंडिया सातत्याने खराब प्रदर्शन करतेय. आधी श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीज, त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीज आणि अलीकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वीकारावा लागलेला दारुण पराभव. इतकच नाही, ऑस्ट्रेलियात दौऱ्यात टीममध्ये अंतर्गत मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या. टीमची खालावलेली कामगिरी आणि ड्रेसिंग रुममधील वादाच्या बातम्या समोर आल्यानंतर BCCI काही कठोर पावल उचलेल अशी अपेक्षा होती. बीसीसीआयने रिव्यू मीटिंगनंतर काही निर्णय घेतले आहेत. टीममध्ये एकोपा वाढवणं आणि प्रदर्शन सुधारण्यासाठी बीसीसीआयने 10 कठोर नियम बनवले आहेत. जाणून घेऊया हे नियम.

– बीसीसीआयने सर्वच क्रिकेटपटूंसाठी देशांतर्गत क्रिकेट सामने खेळणं बंधनकारक केलं आहे. सर्व क्रिकेटपटूंना देशांतर्गत इकोसिस्टमशी जोडून ठेवणं हा या गाइडलाइनमागे मुख्य उद्देश आहे. यामुळे उदयोन्मुख क्रिकेटर्सना देशातील टॉप क्रिकेटर्ससोबत खेळण्याची संधी मिळेल. नॅशनल टीमच्या खेळाडूंना यातून सवलत हवी असेल, तर आधीच सिलेक्शन कमिटीला तसं सांगाव लागले.

– बीसीसीआयने सर्वच खेळाडूंना मॅचपासून ते प्रॅक्टिस सेशन पर्यंत एकत्र प्रवास करणं अनिवार्य केलं आहे. काही खास कारण असल्यास स्वतंत्र प्रवास करण्यासाठी हेड कोच, सिलेक्शन कमिटीचे चेअरमनची परवानगी घ्यावी लागेल.

– यापुढे दौऱ्यावर जाताना लिमिट बाहेर सामान असल्याने खेळाडूंना स्वत:ला त्याचा खर्च करावा लागेल. बोर्डाच्या गाइडलाइननुसार 30 दिवसापेक्षा जास्तच्या परदेश दौऱ्यासाठी खेळाडू 150 किलो वजन घेऊन जाऊ शकतात. तेच सपोर्ट स्टाफला 80 किलो वजन नेता येईल. 30 दिवसापेक्षा कमी कालावधीच्या दौऱ्यासाठी 120 किलो वजनी सामान नेण्याची परवानगी असेल. सपोर्ट स्टाफला 60 किलो वजन नेण्याची परवानगी असेल. दुसरा नियम देशांतर्गत मालिकांसाठीही असेल.

– आता कुठलाही प्लेयर सीरीज दरम्यान सोबत पर्सनल स्टाफ उदहारणार्थ शेफ, पर्सनल मॅनेजर, ट्रेनर, सेक्रेटरी किंवा असिस्टेंट घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी बोर्डाची परवानगी लागेल.

– बंगळुरुमध्ये असलेल्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये खेळाडूंना व्यक्तीगत सामान, उपकरण पाठवण्यासाठी टीम मॅनेजमेंटशी चर्चा करावी लागेल. एक्स्ट्रा खर्च असल्यास स्वत:ला पेमेंट करावं लागेल.

– सर्व खेळाडूंना प्रॅक्टिस सेशन दरम्यान एकत्र रहावं लागेल. वेळेआधी ते ट्रेनिंग सेशनमधून बाहेर निघू शकत नाही.

वेन्यूच्या ठिकाणी एकत्र ट्रॅव्हल करावा लागेल.

– बीसीसीआयच्या नवीन नियमानुसार खेळाडू आता कुठल्याही दौऱ्यावर किंवा सीरीज दरम्यान पर्सनल एड शूट करु शकत नाहीत.

– टीम परदेश दौऱ्यावर 45 किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांसाठी जात असेल, तर खेळाडूची पत्नी, पार्टनर किंवा कुटुंब त्या दौऱ्यावर फक्त 14 दिवस सोबत राहू शकतात. बीसीसीआय रहाण्याशिवाय त्यांचा दुसरा कुठलाही खर्च करणार नाही.

– बोर्डाच ऑफिशियल एड शूट, प्रमोशनल एक्टिविटी किंवा कार्यक्रमाला खेळाडूंनी उपस्थित राहणं आवश्यक आहे.

– सीरीज किंवा मॅच लवकर संपली, तर प्लानिंगनुसारच ट्रॅव्हल करावं लागेल. वेळेआधी टीमला सोडून जाता येणार नाही. त्यांना टीमसोबतच रहावं लागेल.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....