‘तो’ पराभव जिव्हारी, आंद्रे रसेलचा आयपीएलमधील शॉवर किस्सा!

आयपीएल 2018 मधील सनरायझर्स हैद्राबाद सोबतच्या बाद फेरीतील सामन्याचा अनुभव रसेलने सांगितला

'तो' पराभव जिव्हारी, आंद्रे रसेलचा आयपीएलमधील शॉवर किस्सा!
Andre Russell

मुंबई : आयपीएलमधील स्फोटक फलंदाजाच्या यादीत महत्त्वाच्या स्थानी असणारा खेळाडू म्हणजे वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल (Andre Russell). आपल्या धडाकेबाज खेळीमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या रसेलने अनेक कठीण सामने कोलकाता नाईट रायडर्सला(Kolkata Knight Riders) जिंकवून दिले आहेत. मात्र आयपीएल 2018 (IPL 2018) मधील एका सामन्यातील पराभव त्याच्या इतका जिव्हारी लागला की दुखाच्या भरात तो क्रिकेट किट घालून सर्व क्रिकेटच्या साहित्यासह शॉवरमध्ये शिरला होता. (Andre Russell went into shower with Cricket clothes on Heartbreaking Dismissal in IPL 2018)

हा प्रसंग सनराइजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या बाद फेरीतील सामन्यानंतर घडला होता. या सामन्यात संघाला रसेलच्या तडाखेबाज खेळीची अत्यंत गरज असताना रसेल लवकर बाद झाला होता. ज्यामुळे केकेआरला केवळ 14 धावांनी सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान हा पराभव रसेलच्या इतका जिव्हारी लागला की तो क्रिकेटचे कपडे, शूज आणि किटसह शॉवरमध्ये शिरला होता. ज्यामुळे त्याचे कपडे, शुज आणि क्रिकेटचा साहित्यही भिजलं होतं.

‘मी असं करायला नको होतं’

सामन्यानंतरच्या अनुभवाबद्दल रस्सल म्हणाला, ”विजयासाठी आम्हाला 57 धावांची गरज असताना राशिद खानने (Rashid Khan) मला बाद केले. ज्यानंतर मी शांतपणे ड्रेसिंग रुममध्ये जाऊन शॉवरखाली उभा राहिलो. खरंतर मी असं काही करायला नको होतं. मात्र मला आनंद आहे की मला असं करताना कोणी पाहिला नाही, नाहीतर मला आणखी वाईट वाटलं असते”

केकेआर आणि हैद्राबाद सामन्याचा थरार

सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी करत 174 धावांचे आव्हान कोलकात्यासमोर ठेवले होते. ज्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात उत्तम झाली होती. सलामीवीर ख्रिस लीनच्या 48 धावांच्या जोरावर केकेआरने केवळ 2 विकेट गमावत 93 धावा केल्या होत्या. मात्र सलामीवीर लीन आणि सुनिल नारायण बाद झाल्यानंतर कोलकात्याचे एक-एक फलंदाज बाद होत गेले आणि बघता बघता सामना केकेआरच्या हातातून निसटू लागला.  रसेल फलंदाजीला आला त्यावेळी विजयासाठी केकेआरला 33 चेंडूत 57 धावांची गरज होती. रसेलची यापूर्वीची खेळी पाहता तो सामना फिरवेल असा विश्वास केकेआरच्या चाहत्यांना होता मात्र हैद्राबादच्या राशिद खानने रसेलला अवघ्या तीन धावांवर बाद करुन सामना हैद्राबादला जिंकून दिला.

संबंधित बातम्या 

WTC Final : विजयासाठी भारतीय फलंदाजांनी आखली खास रणनीती, टीम इंडियाचं ‘मिशन-400’ नेमकं काय?

IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा   

तर सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली तब्बल 30 शतकांनी पुढे असेल!

(Andre Russell went into shower with Cricket clothes on Heartbreaking Dismissal in IPL 2018)