भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिका जिंकली

भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिका जिंकली

India vs Australia 2nd T20 : बंगळूरु दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सात विकेट्स राखून पराभव केला. यासोबतच ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांची ही टी-20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. या सामन्यात भारताने पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर 191 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 20 षटकांच्या आतच पूर्ण केलं. टी-20 सिरीजचा दुसरा सामना आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगला.

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या सामन्यात दमदार 56 धावा करणाऱ्या मॅक्सवेलने आजच्या सामन्यातही दमदार खेळी खेळली. मॅक्सवेलने 52 चेंडूत 113 धावांची खेळी खेळली. तर डार्सी शॉर्ट याने 40 धावा काढल्या. कर्णधार फिंच हा एक चौकार ठोकत अवघ्या 8 धावांवर बाद झाला. मार्कस स्टॉयनीस त्रिफळाचीत याने 11 चेंडूत 7 धाव्या केल्या.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या राहुलचे अर्धशतक दुसऱ्या सामन्यात मात्र हुकले. त्याने 26 चेंडूत 47 धावांची खेळी केली. रोहितच्या जागी घेतलेल्या  शिखर धवनने सुरुवात चांगली केली मात्र तो 24 चेंडूत फक्त 14 धावा करण्यात यशस्वी झाला. त्यानंतर तो झेलबाद झाला. ऋषभ पंतही या सामन्यात काही खास कमाल करु शकला नाही, त्याने 6 चेंडूत फक्त 1 धाव करून तो झेलबाद झाला. पण त्यानंतर कोहली आणि धोनीच्या जोडीने सामना सांभाळला. कोहलीने अवघ्या 30 चेंडूत अर्धशतक ठोकलं, तर धोनीने 23 चेंडूत 40 धावा काढल्या. दिनेश कार्तिकने शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 2 चौकार मारले. शेवटच्या चेंडूवर षटकार लावत कोहलीने ऑस्ट्रेलिसमोर 191 धावांचं आव्हान ठेवलं. भारताचे गोलंदाजही या सामन्यात अपयशी ठरले. गोलंदाज विजय शंकरने 2 तर सिद्धार्थ कौलने 1 विकेट घेतली. तर जसप्रित बुमराह, कृणाल पंड्या आणि यजुवेंद्र चहल एकही विकेट घेण्यात यशस्वी ठरले नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI