T20 World Cup : टी-20 विश्वचषक भारतात होणार का? सुनील गावसकरांचं मोठ विधान, म्हणाले…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विशेष बैठकीत आयपीएलबाबत निर्णय झाला. मात्र टी-20 विश्वचषक भारतात घेण्यावर कोणतीच चर्चा झाली नसल्याचं समोर येत आहे.

T20 World Cup : टी-20 विश्वचषक भारतात होणार का? सुनील गावसकरांचं मोठ विधान, म्हणाले...
Sunil Gavaskar

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज विशेष कार्यकारिणीचं (Special Genral Meeting) आयोजन केलं होतं. या बैठकीत आयपीएलसह विश्वचषक भारतात घेण्याच्या निर्णयावरही चर्चा होणार असल्यानं सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचे (IPL 2021) उर्वरीत सामने यूएईला होणार असल्याची माहिती या बैठकीत दिली. तर टी-20 विश्वचषक भारतात घेण्याबाबत 1 जून रोजी अंतिम बैठक होणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. याच निर्णयावर भाष्य करताना माजी क्रिकटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले, ”भारतातील परिस्थिती सध्या सकारात्मक दिसत असल्याने टी-20 विश्वचषक भारतात होण्याची दाट शक्यता आहे.” (After BCCI SGM Sunil Gavaskar Reaction on T20 World Cup)

भारतात वाढत्या कोरोना संसर्गामुळे टी-20 विश्वचषक भारतात होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात होती. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायक हस्सी याने देखील विश्वचषक भारतात घेणे धोक्याचे असल्याची प्रतिक्रिया दिली होती. यासर्वामुळे बीसीसीआय सर्व विचार करुन योग्य तो निर्णय घेणार होती. आता हा निर्णय 1 जून रोजी होणाऱ्य बैठकीत घेण्याची शक्यता आहे. यावेळी गावस्करांनी ऑस्ट्रेलियन ओपनचे उदाहरण देताना सांगितले की, ”ऑस्ट्रेलियात कोरोनाच्या कितीतरी केसेस असताना देखील त्याठिकाणी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा घेण्यात आली. त्याप्रमाणेज योग्य काळजी घेऊन भारतातही विश्वचषकाचे आयोजन केले जाऊ शकते.”

स्पर्धा युएईत होण्याचीही शक्यता

गावस्कर यांच्या मते, जर भारतातील कोरोना परिस्थिती ऑगस्ट पर्यंत आटोक्यात आली नाही, तर विश्वचषकाची स्पर्धा आयपीएलप्रमाणे युएईत (UAE) घेतली जाऊ शकते. भारतात सामने न झाल्यास युएई हा एक चांगला पर्याय असल्यांच गावस्करांनी सांगितलं. यावेळी ऑस्ट्रेलियाला टोला देताना गावस्कर म्हणाले, ”ऑस्ट्रेलिया विश्वचषकाचं यजमानपद मिळवू इच्छितो पण चषक भारतातच व्हायला हवा.

परदेशी खेळाडूंचा मुद्दा महत्त्वाचा

विश्वचषकाच्या नियोजनात परदेशी खेळाडू आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मुख्य असणार आहे. सर्व खेळाडूंना एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये सुरक्षितपणे घेऊन जाणे तसेच कोरोनासंबधी सर्व बाबींची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बीसीसीआयसमोर विश्वचषक आयोजनात परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा मुख्य असणार आहे.

संबंधित बातम्या 

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

T20 World Cup : टी 20 वर्ल्डकप भारतात होणार की नाही, BCCI च्या बैठकीत काय ठरलं?

(After BCCI SGM Sunil Gavaskar Reaction on T20 World Cup)