Aus vs Ind | अश्विन-विहारीची झुंजार खेळी, देशभरातून कौतुकाचा वर्षाव, सेहवाग म्हणतो…..

हनुमा विहारी आणि अश्विन या जोडीने 259 चेंडूंमध्ये निर्णायक क्षणी महत्वपूर्ण 62 धावांची नाबाद भागीदारी केली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:36 PM, 11 Jan 2021
aus vs ind 3rd test, netizens, appreciate, hanuma vihari, ravichandran ashwin,
अश्विन आणि हनुमा विहारी

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd test) यांच्यातील तिसरा सामना अनिर्णित राहिला. यामुळे 4 कसोटी सामन्यांमधील मालिकेत 1-1 अशी बरोबरी कायम आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले होते. रिषभ पंत (Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshawar Pujara) मोठ्या खेळीमुळे टीम इंडियाच्या जिंकण्याची संधी होती. मात्र दोन्ही सेट फलंदाज निर्णायक क्षणी बाद झाले. त्यामुळे हा सामना टीम इंडियाकडून ड्रॉ च्या उद्देशाने खेळण्यात आला. हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) हा सामना ड्रॉ करण्यात मोठी भूमिका बजावली. त्यामुळे सोशल मीडियावर टीम इंडियाच्या आजी माजी खेळाडू आणि नेटीझन्सकडून विहारी-अश्विन जोडीचं कौतुक केलं जात आहे. (aus vs ind 3rd test netizens appreciate to hanuma vihari and ravichandran ashwin)

विहारी-अश्विनची झुंजार भागीदारी

पंत पाठोपाठ पुजारा आऊट झाला. टीम इंडियाने महत्वाच्या दोन फलंदाजांची विकेट गमावली. त्यामुळे विजयाची आशा कमी झाली. यावेळेस टीम इंडियाचा पराभव होण्याचीही शक्यता होती. सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरणारी ही वेळ होती. त्यामुळे अश्विन आणि विहारीच्या खांद्यावर जबाबदारी होती. पुजारा बाद झाल्यानंतर टीम इंडियाची धावसंख्या 5 बाद 272 अशी होती.

अश्विन-विहारीने खेळायाला सुरुवात केली. अतिशय शांतपणे या दोघांनी खेळ केला. कांगारुंनी ही जोडी फोडण्यासाठी सर्व मार्ग अवलंबले. मात्र या दोघांनी आपला संयम सोडला नाही, दोघेही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करत होते. या दोघांनी तब्बल पाचव्या दिवसखेर 259 चेंडूंचा सामना केला. यात या दोघांनी नाबाद 62 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यासह दोघेही सामना अनिर्णित करण्यात यशस्वी राहिले.

या दोघांनीही प्रत्येकी 100 पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला. अश्विनने 128 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 39 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 161 चेंडूमध्ये 4 फोरसह नाबाद 23 धावा केल्या.

टीम इंडियाचा माजी फंलदाज वीरेंद्र सेहवागनेही फिल्म टेम्पलेटद्वारे ऑस्ट्रेलियाला डिवचवलं आहे. तसेच पंत आणि विहारी-अश्विनचं कौतुक केलं आहे. हेरा फेरी आणि शिवाजी द बॉस या सिनेमातील टेम्पलेट असलेले 2 फोटो सेहवागने ट्विट केलं आहे.

विहारी टीम इंडियाचा नवा संकटमोचक

विहारीने केलेल्या या झुंजार खेळीचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे. विहारीच्या रुपात टीम इंडियाला नवा ‘द वॉल’ मिळाला आहे, असा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.

हनुमा विहारीबाबत केलेलं ट्विट

संबंधित बातम्या :

Aus vs Ind, 3rd Test | जाडेजा मैदानात न उतरल्याचा फायदा, कांगारुंचा लाजिरवाणा पराभव टळला

Australia vs India, 3rd Test, 5th Day Live : संकटमोचक हनुमा विहारीला अश्विनची साथ, तिसरी कसोटी ड्रॉ

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

(aus vs ind 3rd test netizens appreciate to hanuma vihari and ravichandran ashwin)

लाईव्ह टीव्ही