”रवींद्र जाडेजामुळे मला संघात स्थान मिळत नाही”, भारताच्या अष्टपैलू खेळाडूचा मोठा खुलासा

सात वर्षांपूर्वी 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करुनही केवळ 38 एकदिवसीय सामने आणि 12 टी-20 खेळू शकणाऱ्या खेळाडूने दिली प्रतिक्रिया

''रवींद्र जाडेजामुळे मला संघात स्थान मिळत नाही'', भारताच्या अष्टपैलू खेळाडूचा मोठा खुलासा
रवींद्र जाडेजा

मुंबई : रवींद्र जाडेजा हा सध्या भारतीय संघातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र डावखुऱ्या जाडेजामुळे आणखी एका 27 वर्षीय डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळण कठीण झालं आहे. 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करुनही केवळ 38 एकदिवसीय सामने आणि 12 टी-20 खेळू शकणाऱ्या खेळाडूने स्वत: ही माहिती दिली आहे. हा खेळाडू दुसरा-तिसरा कोणी नसून नुकतच इंग्लंडविरोधात कसोटी पदार्पण करणारा अक्षर पटेल (Axar Patel) हा आहे. (Axar patel Says Ravindra Jadeja is Problem For my place in Indian Cricket Team)

अक्षरने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ही माहिती दिली. अक्षरच्या मते ”जाडेजा ज्याप्रकारे अप्रतिम खेळ दाखवत आहे, त्यानुसार तो असेपर्यंत इतर कोणत्याही डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूला संधी मिळणे कठीण आहे. तसंच मी भारतीय संघात निवडला जाऊ शकतो पण अंतिम 11 मध्ये जाडेजालाच संधी मिळणार हे नक्की!”

संधी न मिळाल्याने अक्षर निराश

अक्षर पटेल ऑक्टोबर, 2017 पासून एकही एकदिवसीय सामना खेळला नाही. त्यामुळे योग्य संधी न मिळाल्याने तो निराश असल्यांच त्यानं सांगितलं. पण त्यामुळे संयम ठेवायला ही शिकलो आणि संयम ठेवून आपल्या संधीची वाट पाहणंच योग्य असल्याचं मत अक्षरन यावेळी नोंदवलं

ड्ब्लुटीसीमध्ये जाडेजा IN अक्षर OUT

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final) भारतीय संघाची घोषणा करण्यात सआली आहे. यात विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. अक्षर आणि जाडेजा दोघेही इंग्लंडला जात असले तरी अंतिम 11 मध्ये अक्षरच्या जागी जाडेजाला संधी देण्यात आली आहे.

संबधित बातम्या

WTC Final: न्यूझीलंडला मात देण्यासाठी भारतीय संघाचा ‘सिक्रेट प्लॅन’, 72 तासांच विशेष मिशन

WTC Final : भारताचे ‘हे’ दोन खेळाडू न्यूझीलंडसाठी मोठा धोका, फलंदाज हेन्री निकोल्सने वर्तवली चिंता

Video : WTC फायनलअगोदर जीममध्ये घाम, रिषभ पंतचा हा स्टंट पाहिला का?

(Axar patel Says Ravindra Jadeja is Problem For my place in Indian Cricket Team)