BCCI SGM : टी 20 वर्ल्डकप भारतात होणार की नाही? BCCI ची विशेष बैठक, IPL बाबतही मोठा निर्णय अपेक्षित

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयोजित केलेल्या विशेष कार्यकारीणी बैठकीमध्ये (Special General Meeting) आज भारतीय क्रिकेटसंबधी अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल. यात आयपीएल 2021 आणि टी-20 विश्वचषक 2021 हे मुख्य मुद्दे असतील

BCCI SGM : टी 20 वर्ल्डकप भारतात होणार की नाही?  BCCI ची विशेष बैठक, IPL बाबतही मोठा निर्णय अपेक्षित
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Bcci President Sourav Ganguly)

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचे (IPL 2021) उर्वरीत सामने कधी होणार? याबाबत विविध चर्चांना उधान आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज आयोजित केलेल्या विशेष कार्यकारीणी बैठकीत (Special Genral Meeting) याबाबत निर्णय होऊ शकतो. आयपीएलसह यंदा भारतात होऊ घातलेल्या टी-20 विश्वचषकाबद्दलही (ICC T-20 World Cup) निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. (BCCI Organised SGM Today Will Take Decision On IPL 2021 and ICC T 20 World Cup)

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सीगद्वारे या बैठकीचे नेतृत्तव करण्याची शक्यता आहे. या बैठकीत 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान आयपीएलचे सामने युएईत (UAE) होण्याबाबत निर्णय होऊ शकतो. तसेच वर्षाखेरीस भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकालाही कोरोनाच्या संकटामुळे परदेशात घेण्याचा निर्णय आज होऊ शकतो. बीसीसीआयला यंदाचा टी-20 विश्वचषक भारतातच घ्यायचा आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे खेळाडूंची सुरक्षा , कोरोनाप्रतिबंधक नियम इत्यादी प्रश्न निर्माण झाल्याने आजच्या बैठकीत या सर्वांवर चर्चा केली जाणार आहे. आयपीएल आणि विश्वचषकासह मागील वर्षी रद्द करण्यात आलेल्या रणजी स्पर्धेवरही (Ranji Trophy) अनौपचारिकरित्या चर्चा केली जाऊ शकते.

कशी असेल उर्वरीत IPL 2021

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ‘‘या बैठकीचा मुख्य मुद्दा आयपीएल असणार आहे. उर्वरीत आयपीएलमध्ये 27 सामन्यांसह अंतिम सामना आणि चार बाद फेरीचे सामने खेळवले जातील. 15 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान सुरु होणारी ही स्पर्धा 10 ऑक्टोबरपर्यंत संपवण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

परदेशी खेळाडूंचा मुद्दा महत्त्वाचा

संपूर्ण आयपीएलच्या नियोजनात परदेशी खेळाडू आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मुख्य असणार आहे. सर्व खेळाडूंना एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये सुरक्षितपणे घेऊन जाण्याच्या मुद्यावर अधिक चर्चा होईल. त्यातच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू टी-20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेआधी आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे इतर क्रिकेट बोर्डांची काय भूमिका आहे, यावर ही चर्चा करण्यात येईल.

स्थानिक खेळाडूंबद्दलही चर्चा

या बैठकीत मागील वर्षी रद्द करण्यात आलेल्या रणजी स्पर्धेबाबत अनौपचारिक चर्चा केली जाऊ शकते. अनेक स्थानिक खेळाडूंसाठी रणजी स्पर्धा अत्यंत महत्त्वाची असते. मागील वर्षी बीसीसीआयने जानेवारीमध्ये खेळाडूंना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे यंदा देशांतर्गत स्पर्धांचे काय होणार? हे पाहावे लागेल. याबाबत रणजी स्पर्धेसंबधीत एका अधिकाऱ्याने सांगितले की, ”आयपीएलमध्ये केवळ 73 स्थानिक खेळाडूंना संधी मिळते. उर्वरीत खेळाडू केवळ विजय हजारे (Vijay Hajare Trophy) आणि सैय्यद मुश्ताक अली चषक (Sayyed Mushtak Ali Trophy) स्पर्धा खेळून आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करु शकत नाहीत. त्यामुळे इतर स्पर्धांबाबत ही योग्य निर्णय व्हायलाच हवा”

टी-20 विश्वचषकाचं काय?

यंदाचा टी-20 विश्वचषक भारतात आयोजित करण्यात येणार होता. मात्र भारतात वाढत्या कोरोना संकटामुळे विश्वचषक यूएईला घेतला जाऊ शकतो. यावर बोलताना बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले ‘‘केवळ आठ संघ असणारी आयपीएलसारखी देशांतर्गत स्पर्धा भारतात घेणे कठीण असताना, 16 आंतरराष्ट्रीय संघ असणारा विश्वचषक घेणे कठीण आहे’’

संबधित बातम्या :

MS धोनी की विराट कोहली, सर्वोत्तम कर्णधार कोण? इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो…

भारत-इंग्लंड मालिकेत ‘हा’ खेळाडू सर्वांत जास्त रन्स करणार, इंग्लंडच्या दिग्गजाची आणखी एक भविष्यवाणी!

भारत विराट कोहलीपेक्षा जास्त रवी शास्त्रींची टीम, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य

(BCCI Organised SGM Today Will Take Decision On IPL 2021 and ICC T 20 World Cup)