आयपीएलमध्ये भन्नाट कामगिरी, तरीही ‘या’ भारतीय खेळाडूसाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद!

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या नवोदीत युवा खेळाडू उदयास येत असल्याने सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाच केवळ संधी मिळत आहे.

आयपीएलमध्ये भन्नाट कामगिरी, तरीही ‘या’ भारतीय खेळाडूसाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद!
भारतीय क्रिकेट संघ

मुंबई : रणजी क्रिकेट स्पर्धा ही देशांतर्गत क्रिकेटमधील एक महत्वाची स्पर्धा मानली जाते. अशा महत्त्वाच्या स्पर्धेच्या एकाच हंगामात 67 विकेट्स घेत आपल्या संघाला चषक जिंकवून दिलेल्या खेळाडूसाठी भारतीय संघाची (Indian Cricket Team) दार कायमची बंद झाली आहेत. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) , रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) या दिग्गजांसोबत खेळलेल्या या खेळाडूचे नाव आहे जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat). राजस्थान रॉयल्स संघाचा (Rajsthan Royals) महत्त्वाचा गोलंदाज असलेला जयदेव सध्या भारतीय संघात निवडीसाठी प्रयत्न करत आहे. मात्र जयदेवला यापुढे भारतीय संघात स्थान मिळणार नाही, अशी माहिती भारताचे माजी गोलंदाज आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI Selector) निवड समितीचे सदस्य करसन घावरी (Former Indian Pacer Karsan Ghavri) यांनी टाइम्‍स ऑफ इंडियाशी बोलताना दिली. (BCCI Selector says Jaydev Unadkat Wont be Picked for India anymore)

वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने 2010 साली भारतीय संघात पदार्पण केले. हातावर मोजण्याइतके आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर मागील बऱ्याच काळापासून जयदेवला संघात स्थान मिळत नव्हते. काही दिवसांपूर्वी जयदेवने एका मुलाखतीत पुन्हा भारतीय संघात स्थान मिळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र असे काही झाले नाही. याउलट बीसीसीआयच्या निवड समितीचे सदस्य करसन घावरी यांनी जयदेवला भारतीय संघात कधीच स्थान मिळणार नाही असे स्पष्ट केले.

अजून किती वर्ष खेळेल?

करसन घावरी यांच्या मते उनाडकट सध्या भारताच्या अव्वल 30 खेळाडूंतही मोडत नाही. तसेच त्याचे वयही वाढत असल्याने त्याच्यासाठी पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवणे अतिशय अवघड आहे. तसेच एखाद्या वयस्कर खेळाडूला संधी देऊन त्याच्यावर मेहनत घेण्यापेक्षा एखाद्या 21, 22 वर्षीय नवोदीत खेळाडूला संधी दिल्यास तो आणखी 10 ते 12 वर्ष संघासाठी खेळू शकतो. उनाडकटचे वय वाढत असल्याने तो अजून जास्त काळ खेळू शकणार नाही असंही घावरी म्हणाले.

भारतीय संघातील कामगिरी

30 वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट भारतीय संघाकडून 1 कसोटी, 7 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळला आहे. कसोटीत त्याला एकही विकेट मिळाली नसून 7 एकदिवसीय सामन्यांत 8 आणि 10 टी-20 सामन्यांत 14 विकेट मिळाल्या आहेत. उनाडकटने 89 प्रथम श्रेणी सामन्यांत 327 विकेट घेतल्या असून आयपीएलमध्ये 84 सामन्यांत त्याच्या नावावर 85 विकेट्स आहेत.

भारताकडे वेगवान गोलंदाजाची तगडी फौज

सध्या भारतीय संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. युवा खेळाडूंचे यात विशेष योगदान असून बरेच वेगवान गोलंदाज सध्या भारताकडे आहेत. यात जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah), मोहम्मद शमी (Mohammad Shami), उमेश यादव (Umesh Yadav), इशांत शर्मा (Ishant Sharma) या दिग्गजांसोबत मोहम्मद सिराज (Mohmmad Siraj), नवदीप सैनी (Navdeep saini) आणि टी. नटराजन (T. Natrajan) या युवा खेळाडूंचा सहभाग आहे.

संबंधित बातम्या 

सुनील शेट्टीची लेक KL Rahul च्या फिटनेसवर फिदा, फोटोवर कमेंट करुन म्हणाली…

Photo : ‘अरे बाबांनो मी तिचा मालक नाहीय’, इरफान खान बायकोच्या त्या फोटोवरुन ट्रोलर्सवर भडकला

Video : है तय्यार हम! भारतीय क्रिकेटपटूंचा सराव जोमात सुरु

(BCCI Selector says Jaydev Unadkat Wont be Picked for India anymore)