R Ashwin : रविचंद्रन अश्विन याच्या ट्वीटवर आली ‘नरेंद्र मोदी’ या नावाने कमेंट्स, स्टार क्रिकेटरने दिलं असं उत्तर
R Ashwin Reaction : चंद्रयान 3 मिशन इस्रोनं यशस्वी करून दाखवलं. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. इस्रोच्या कामगिरीसाठी संपूर्ण देशातून कौतुकाचा पाऊस पडला.

मुंबई : भारताने चंद्रावर आपला ठसा उमटवला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रयान 3 मिशनची चर्चा रंगली होती. चंद्रयान 2 च्या अपयशानंतर पुन्हा उभारी घेत इस्रोनं चंद्रयान 3 मिशनसाठी तयारी केली होती. अपयशातून उभारी घेत इस्रोनं यश संपादन केलं आहे. भारतीयांना 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी ऐतिहासिक क्षण अनुभवता आला.चंद्रावर अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश आहे. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच देशभरात जल्लोष करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी इस्रोच्या या कामगिरीचं कौतुक केलं. भारतीय क्रिकेट स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानेही इस्रोचं कौतुक करत ट्वीट केलं. विशेष म्हणजे या ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या हँडलवरून प्रतिक्रिया मिळाली. त्यानंतर अश्विनने दिलेलं उत्तर पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.
आर. अश्विन याने काय ट्वीट केलं?
दिग्गज क्रिकेटपटून आर. अश्विन याने इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. अश्विन याने ट्वीट करत लिहिलं की, ‘ऐतिहासिक, इस्रोच्या दैदिप्यमान कामगिरीसाठी शुभेच्छा जय हिंद.’ त्याच्या ट्वीटखाली चाहत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. पण आर. अश्विनच्या ट्वीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने असलेल्या ट्विटर हँडलवरून प्रतिक्रिया आली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. “प्रत्येक भारतीयांना शुभेच्छा. हे शक्य करून दाखवणाऱ्या इस्रोचं धन्यवाद”
Congratulations to every indian ❤️ thank you ISRO for making this possible..
— Narendra Modi (Parody) (@NarendramodiPa) August 23, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्यास त्याकडे लक्ष जाणं स्वाभाविकच आहे. पण हे ट्विटर हँडल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं असून त्यांच्या नावाने तयार केलेलं पॅरोडी अकाउंट होतं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खऱ्या हँडलचा फोटोही लावलेला आहे. पण नावाच्या पुढे पॅरोडी असं लिहिलं होतं. तसेच यात ब्लू टिकही होतं.
Sir how are you? I am so glad you replied to my tweet. I am honoured 🤩
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) August 23, 2023
अश्विनने दिली मजेशीर प्रतिक्रिया
आर. अश्विन यानेही आलेल्या प्रतिक्रियेवर कमेंट्स देण्याची संधी सोडली नाही. त्याने अशी प्रतिक्रिया दिली की, सोशल मीडियावरील युजर्संना हसू आलं. अश्विनने लिहिलं की, “सर तुम्ही कसे आहात? मला खूप आनंद झाला की तुम्ही माझ्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिलीत. हा माझा सन्मान आहे.” अश्विनच्या फिरकी ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं हे देखील तितकंच खरं आहे.
