भेदक गोलंदाजी, दुसऱ्या महायुद्धात कमांडर, ‘कोलकात्या’चा हा खेळाडू तुम्हाला माहित आहे का?

कारकिर्दीत दोन वेळा 4 चेंडूंवर 4 बळी पटकावणारा एकमेव गोलंदाज गिर्यारोहक आणि सैन्यात कमांडर ही होता. दक्षिण आफ्रिकेचा या खेळाडूचा जन्म भारतात झाला होता.

भेदक गोलंदाजी, दुसऱ्या महायुद्धात कमांडर, 'कोलकात्या'चा हा खेळाडू तुम्हाला माहित आहे का?
bowling

कोलकाता : ‘बहुरुपी’ ही उपमा तंतोतत शोभणारे एक क्रिकेटपटू इतिहासात होऊन गेले. भेदक गोलंदाजीने फलंदाजाना सळो की पळो करायचे, गिर्यारोहन करताना मोठ-मोठी शिखर सहज सर करायचे आणि दुसऱ्या महायुद्धात कमांडरच्या भूमिकेसह पत्रकारीता ही केली. असे हा बहुरुपी खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाचे (South Africa Cricket Team) वेगवान गोलंदाज बॉब क्रिस्‍प (Bob Crisp). आज त्यांचा वाढदिवस असून भारताशी त्यांच एक खास नातं होतं. (Cricketer served in world war two South African Fast Bowler Bob Crisp Birthday Today)

Bob Crisp

बॉब क्रिस्प

बॉब क्रिस्‍प यांचा जन्म 28 मे 1911 रोजी पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात झाला होता. ब्रिटीश इंडियाचा भाग असणारं कोलकाता तेव्हा कलकत्ता म्हणून ओळखलं जायचं. बॉब यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात 1929 मध्ये केली. 1923 ते 1931 पर्यंत ते रोडेशियासाठी खेळायचे. त्यानंतर 1931 ते 32 साली वेस्‍टर्न प्रोविंससाठी खेळताना त्यांनी संघासाठी बरेच विकेट्स घेतले. यातील 64 धावांत 9 विकेट ही त्यांची सर्वात उत्तम कामगिरी आहे.

दक्षिण आफ्रीकेकडून अप्रतिम प्रदर्शन

बॉब यांनी 15 जून 1935 रोजी दक्षिण आफ्रिका संघाकडून आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्‍लंडच्या संघाविरोधात त्यांनी आपला पहिला सामना खेळला. संपूर्ण कारकिर्दीत बॉब यांनी आफ्रिकेकडून 9 कसोटी सामन्यांत 20 विकेट्स मिळवल्या. ज्यामध्ये 99 धावां देत 5 विकेट घेणे ही त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. याशिवाय बॉब यांनी 62 प्रथम श्रेणी सामन्यांत 276 फलंदाजाना तंबूत धाडलं होतं. 1994 साली वयाच्या 82 व्या वर्षी बॉब यांच निधन झालं.

क्रिकेटशिवाय बॉब यांच आयुष्य

बॉब क्रिस्‍प यांच क्रिकेटमधील जीवन तर अप्रतिम होतंच. दोन वेळा 4 चेंडूंवर 4 बळी पटकावणारे ते एकमेव खेळाडू आहेत. याशिवाय बॉब हे दुसऱ्या महायुद्धात थर्ड रॉयल टँक रेजीमेंटचे कमांडर देखील होते. युद्धात ते 5 वेळा गंभीर जखमी झाले होते. या सर्वासोबतच बॉब यांनी माउंट किलिमंजारो या जगातील एका अवघड पर्वतावर चढाई देखील केली होती, ज्यातून ते किती उत्तम गिर्यारोहक होते याची प्रचिती येते.

संबधित बातम्या :

क्रिकेटला रामराम ठोकून कोण पोलीस बनलं, कोण पत्रकार तर कोण पायलट!, वाचा खास….

Sagar Dhankhar Murder: जमिनीवर पडलेला सागर हात जोडत होता, सुशील कुमार दंडुक्याने मारत होता, मर्डरदिवशीचा Video व्हायरल

T-20 World Cup 2021 : चार संघ स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणार तर विश्चचषक ‘हा’ संघ जिंकणार, पाकच्या खेळाडूचं भाकित

(Cricketer served in world war two South African Fast Bowler Bob Crisp Birthday Today)