CSK vs PBKS Live Score, IPL 2021: केएल राहुलची दमदार फलंदाजी, नाबाद 98 धावांची तुफान खेळी, चेन्नईवर 6 गडी राखून विजय

| Updated on: Oct 07, 2021 | 7:11 PM

CSK vs PBKS Live Score in Marathi: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या हंगामातील 53 वा सामना केएल राहुल कर्णधार असणाऱ्या पंजाब किंग्सचा (PBKS) धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सशी होणार आहे.

CSK vs PBKS Live Score, IPL 2021: केएल राहुलची दमदार फलंदाजी, नाबाद 98 धावांची तुफान खेळी, चेन्नईवर 6 गडी राखून विजय
चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब किंग्स

आज यंदाच्या पर्वातील 53 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि पंजाब किंग्स या या संघामध्ये खेळवला गेला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना पार पडला. सामन्यात नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलने गोलंदाजी निवडली. ज्यानंतर फलंदाजी करणाऱ्या चेन्नईचे बहुतेक फलंदाज लवकर बाद झाले. पण सलामीवीर फाफ डुप्लेसीसने मात्र एकहाती खिंड लढवत 76 धावा ठोकल्या. ज्याच्या जोरावर चेन्नईने पंजाबसमोर 135 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या तीन विकेट्स लवकर गेल्या तरी कर्णधार आणि सलामीवीर केएल राहुलने मात्र धुवांधार फलंदाजी नाबाद 98 धावा ठोकल्या आणि संघाला 6 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Oct 2021 06:49 PM (IST)

    CSK vs PBKS : पंजाब 6 विकेट्सनी विजयी

    पंजाबच्या तीन विकेट्स लवकर गेल्या तरी कर्णधार आणि सलामीवीर केएल राहुलने नाबाद 98 धावा ठोकल्या. ज्यामुळे पंजाब 6 विकेट्सनी विजय झाला आहे.

  • 07 Oct 2021 06:27 PM (IST)

    CSK vs PBKS : कर्णधार राहुल ON FIRE

    पंजाबचा कर्णधार केएल राहुल धमाकेदार फलंदाजी करत असून त्याने तुफानी अर्धशतकही झळकावलं आहे.

  • 07 Oct 2021 06:26 PM (IST)

    CSK vs PBKS : शाहरुख खान बाद

    मागील काही सामने उल्लेखणीय खेळी केलेला शाहरुख आज 8 धावा करुन बाद झाला आहे. चाहरने त्याची विकेट घेतली आहे.

  • 07 Oct 2021 05:43 PM (IST)

    CSK vs PBKS : पंजाबचे सलामीवीर मैदानात

    पंजाबचे सलामीवीर केएल राहुल आणि मयांक अगरवाल फलंदाजीसाठी मैदानात आले आहेत.

  • 07 Oct 2021 05:20 PM (IST)

    CSK vs PBKS : चेन्नईची 134 धावांपर्यंत मजल

    चेन्नईची फलंदाजी आज सपशेल फेल होताना दिसली. केवळ सलामीवीर फाफ डुप्लेसीसच्या 76 धावांच्या जोरावर चेन्नईने 134 केल्या आहेत.

  • 07 Oct 2021 05:15 PM (IST)

    CSK vs PBKS : फाफचं धडाकेबाज अर्धशतक

    चेन्नईचा सलामीवीर फाफ डुप्लेसीसने एकहाती झुंज देत धमाकेदार अर्धशतक झळकावलं आहे.

  • 07 Oct 2021 04:19 PM (IST)

    CSK vs PBKS : चेन्नईचा संघ अडचणीत

    चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज बाद होताच मोईन अलीही शून्यावर बाद झाला. अर्शदीपनेच त्याचीही विकेट घेतली.

  • 07 Oct 2021 03:54 PM (IST)

    CSK vs PBKS : ऋतुराज गायकवाड बाद

    चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज आज स्वस्तात माघारी परतला आहे. 15 धावांवर असताना अर्शदीपच्या चेंडूवर शाहरुख खानने त्याचा झेल घेतला आहे.

  • 07 Oct 2021 03:33 PM (IST)

    CSK vs PBKS : चेन्नईचे सलामीवीर मैदानात

    चेन्नई सुपरकिंग्सचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस फलंदाजीसाठी मैदानात आले आहेत.

  • 07 Oct 2021 03:15 PM (IST)

    CSK vs PBKS : चेन्नई प्रथम फलंदाजीला

    सामन्यात नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलने गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे चेन्नईचे खेळाडू प्रथम फलंदाजी करतील.

  • 07 Oct 2021 03:14 PM (IST)

    CSK अंतिम 11

    एमएस धोनी (कर्णधार-विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसी, मोईन अली, रॉबीन उथप्पा, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जॉश हेजलवुड

  • 07 Oct 2021 03:14 PM (IST)

    PBKS अंतिम 11

    केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, ए. मार्करम, सरफराज खान, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, एम. हेन्रिक्स, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग.

Published On - Oct 07,2021 3:11 PM

Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.