India tour of England : भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर माजी कर्णधाराचा आक्षेप, सामन्यांच्या नियोजनावर वर्तविली नाराजी

भारत 18 जून रोजी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी 2 जूनला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे.

India tour of England : भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर माजी कर्णधाराचा आक्षेप, सामन्यांच्या नियोजनावर वर्तविली नाराजी
भारत विरुद्ध इंग्लंड

साऊदम्पटन : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final) अंतिम सामना खेळण्यासाठी 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. 18 जून रोजी फायनल खेळल्यानंतर 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड (England) यांच्यात पाच कसोटी सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. दरम्यान दोन्ही सामन्यांत असणाऱ्या दीड महिन्यांच्य अंतरावर भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) नाराज  झाले आहेत. WTC Final नंतर दीड महिना भारतीय संघ इंग्लंडमध्ये काय करेल? त्यामुळे या दौऱ्याचे नियोजन योग्यरित्या व्हायला हवे होते असं वेंगसरकरांनी म्हटलंय. (Dilip Vengsarkar Is not Happy With India vs England Test Series Schedule)

दिलीप वेंगसरकर क्रिकेटनेकेस्ट या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, ”वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर दीड महिना भारतीय संघ काय करेल? मी इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्यांचे वेळापत्रक पाहून खूप हैराण झालो आहे. हा कशाप्रकारचा दौरा आयोजित केला आहे. असं कसं होऊ शकतं की तुम्ही एक सामना खेळाल आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी दीड महिना वाट पाहावी लागेल. जर पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ जुलैमध्ये इंग्लंडसोबत मॅच खेळणार असतील, तर त्याआधी डब्लूटीसी फायनलनंतर लगेचच भारत आणि इंग्लंड यांच्यात सामने खेळवून घ्यायला हवेत.”

असा असेल इंग्लंडचा दौरा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान खेळवला जाईल. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ज्यात पहिला सामना 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान नॉटिंघम येथे पार पडेल. नंतर 12 ऑगस्टपासून लंडनमध्ये दुसरा, 25 ऑग्स्टपासून लीड्स येथे तिसरा सामना खेळवला जाईल. लंडनमध्ये 2 ते 6 सप्टेंबरदरम्यान चौथा सामना पार पडल्यानंतर पाचवा आणि शेवटचा सामना 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येईल.

WTC Final ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर…?

18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊदम्पटन (Southampton) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बडा मुकाबला पार पडणार आहे. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन जाहीर केल्या आहेत. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून ट्रॉफी देण्यात येईल, असं आयसीसीने जाहीर केलंय. तसंच 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसात जर 30 तासांचा खेळ शक्य नसल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल.

हे ही वाचा :

WTC फायनल खेळायचीय, भारतीय संघाला ICC चे कडक नियम पाळावेच लागतील!

Video : IPL मॅचेससाठी चहलची बायको युएईला जाण्यासाठी तयार, BCCI ने घोषणा करताच डान्सचा खास व्हिडीओ शेअर

एक पराभव आणि प्रशिक्षकाला डच्चू, नामांकित संघाने महान माजी खेळाडूला घरी पाठवलं!

(Dilip Vengsarkar Is not Happy With India vs England Test Series Schedule)