Dinesh Karthik समोर वेस्ट इंडिजचे गोलंदाज हतबल, गोलंदाजी कशी फोडून काढली, ते या VIDEO मध्ये पहा

वनडे सीरीज मध्ये वेस्ट इंडिजला 3-0 अशी धूळ चारल्यानंतर टीम इंडियाने पहिल्या टी 20 सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. भारताने त्रिनिदाद मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिज वर 68 धावांनी मोठा विजय मिळवला.

Dinesh Karthik समोर वेस्ट इंडिजचे गोलंदाज हतबल, गोलंदाजी कशी फोडून काढली, ते या VIDEO मध्ये पहा
dinesh-karthikImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 1:02 PM

मुंबई: वनडे सीरीज मध्ये वेस्ट इंडिजला 3-0 अशी धूळ चारल्यानंतर टीम इंडियाने पहिल्या टी 20 सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. भारताने त्रिनिदाद मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिज वर 68 धावांनी मोठा विजय मिळवला. दिनेश कार्तिक या विजयाचा हिरो ठरला. त्याने आपल्या तुफानी फलंदाजीच्या बळावर सामन्याची दिशाच बदलून टाकली. दिनेश कार्तिकने अवघ्या 19 चेंडूत नाबाद 41 धावा फटकावल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

दिनेश कार्तिकची स्फोटक फलंदाजी

दिनेश कार्तिकने आपल्या 19 चेंडूंच्या इनिंग मध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. स्ट्राइक रेट 215 च्या पुढे होता. दिनेश कार्तिकने जोरदार हिटिंग केली. हे शॉट्स पाहिल्यानंतर कार्तिक चेंडूच्या कानाखाली वाजवतोय, असं वाटत होतं. कार्तिकची फलंदाजीच तशी होती.

पूरनची व्युहरचनाच समजली नाही

दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरलना काय करायचं ते कळत नव्हतं. दिनेश कार्तिक तुफानी बॅटिंग करत होता. त्यावेळी पूरनने 19 व्या षटकात पाच फिल्डर 30 यार्डच्या आत ठेवले होते. पूरनची ही खेळीच समजली नाही. कार्तिकने त्याचा पुरेपूर फायदा उचलला. ऑफ साइड आणि लेग साइडला त्याने मोठे शॉट्स मारले.

दिनेश कार्तिकचा टॉप गेयर

रोहित शर्माचा विकेट गेल्यानंतर दिनेश कार्तिक क्रीजवर आला. 15 व्या षटकात खेळपट्टीवर आलेल्या कार्तिकने विडिंज गोलंदाजांवर हल्लाबोल केला. कार्तिकने अल्जारी जोसेफच्या एका षटकात पहिला चौकार लगावला. त्यानंतर 19 व्या षटकात कार्तिकने होल्डरच्या ओव्हर मध्ये षटकार आणि चौकार लगावला. मॅकॉयच्या शेवटच्या षटकात एक षटकार आणि दोन चौकार लगावले. संघाची धावसंख्या त्याने 190 पर्यंत पोहोचवली. विंडिजसाठी ही खूप मोठी धावसंख्या ठरली.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.