IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार पुन्हा बदलणार, कोण असेल नवा कर्णधार?

कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलच्या 14 व्या पर्वाबाबत (IPL 2021) एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आयपीएलचे उर्वरीत सामने युएईत घेणार असल्याचं सांगितलं आहे.

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार पुन्हा बदलणार, कोण असेल नवा कर्णधार?
कोलकाता नाईट रायडर्स

मुंबई : इंडियन प्रिमीयर लीगचे (IPL 2021) उर्वरीत सामने युएईला (UAE) होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली. नवीन तारखा आणि ठिकाणाच्या दृष्टीने सर्व संघ आपल्या परदेशी आणि स्थानिक खेळाडूंच्या व्यवस्थापनाचा तयारी करु लागले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी-20 विश्वचषक तोंडावर आल्याने आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळयची परवानगी देणार नसल्याची भूमिका घेतली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे (England and Wales Cricket Board) व्यवस्थापक एश्ले जाइल्स (Ashley Giles) यांनी ही माहिती दिली होती. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgen) इंग्लंडचा असल्याने केकेआरला नवा कर्णधार नेमावा लागणार आहे. (Dinesh Karthik may be KKR Captain For IPL 2021 In Absense Of Eoin Morgen)

आयपीएल 2020 सुरु असताना स्पर्धेदरम्यानच केकेआर व्यवस्थापनाने कर्णधारपद दिनेश कार्तिककडून काढून इयॉन मॉर्गनकडे सोपवलं होतं. मात्र आता मॉर्गन नसल्याच पुन्हा कर्णधारपद दिनेश कार्तिकलाच (Dinesh Karthik) दिलं जाण्याची शक्यता आहे. केकेआरच्या संघात कार्तिक सर्वात अनुभवी खेळाडू असल्याने कर्णधारपद त्यालाच दिलं जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. कार्तिकच्या नेतृत्वात केकेआरने 37 पैकी 21 सामन्यांत विजय मिळवला आहे.

पॅट कमिन्सही एक पर्याय

मॉर्गनच्या गैरहजेरीत कार्तिकच कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र केकेआर व्यवस्थापनाकडे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलदांज पॅट कमिन्स (Pat Cummines) हा देखील एक पर्याय आहे. कमिन्स ऑस्ट्रेलिया संघाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा उपकर्णधार असल्याने त्याला कर्णधारपदाचा अनुभव आहे. तसेच आयपीएल 2021 च्या काही सामन्यांत त्याने अप्रतिम कामगिरी केल्यामुळे
त्याला उर्वरीत सामन्यांसाठी कर्णधार केले जाऊ शकते.

IPL 2021 चे आयोजन

आयपीएलचे 31 सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवली होती. यंदा मात्र आयपीएलचे (IPL 2021) सामने भारतात खेळवण्यात आले. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती. बीसीसीआयने आजच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

BCCI SGM : टी 20 वर्ल्डकप भारतात होणार की नाही? BCCI ची विशेष बैठक, IPL बाबतही मोठा निर्णय अपेक्षित

(Dinesh Karthik may be KKR Captain For IPL 2021 In Absense Of Eoin Morgen)