WTC Final : ‘रोहितने केलेल्या चूका तू नको करु’, कपिल देव यांचा ऋषभ पंतला सल्ला

प्रथमच आयोजित केलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या संघात इंग्लंडमध्ये 18 जून ते 22 जूनच्या दरम्यान खेळवला जाणार आहे.

WTC Final : 'रोहितने केलेल्या चूका तू नको करु', कपिल देव यांचा ऋषभ पंतला सल्ला
रिषभ पंत

मुंबई : भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. आधी ऑस्ट्रेलिया (Australia) आणि नंतर इंग्लंड विरोधात महत्त्वाची खेळी करुन त्याने भारताला विजय मिळवून दिला. आता त्याच्यासमोर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्याचे आव्हान आहे. त्यासाठी भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी पंतला एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते पंत ही फलंदाजी करताना रोहित शर्माप्रमाणे काही चूका करत आहे. ज्या सुधारल्यास त्याचा खेळ आणखी चांगला होऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय. (Dont Do same Mistakes which Rohit Sharma Did Kapil Dev Advice to Rishabh Pant)

‘शॉट खेळण्यापूर्वी पुरेसा वेळ घे’

कपिल देव यांनी मिड-डेला दिलेल्या माहितीत सांगितले की, ”पंत अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे, अलीकडे त्याच्या खेळात कमालीची सुधारणा देखील झाली आहे. फक्त त्याने कोणताही शॉट खेळण्यापूर्वी पुरेसा वेळ घ्यायला हवा. तसेच
प्रत्येक शॉट मोठा न खेळता काही वेळेस बॅकफुटवर खेळणे ही महत्त्वाचे आहे. मी रोहितबाबतही हेच म्हणायचो. त्याच्याकडेही बरेच शॉट असताना तो त्यांचा वापर करत नव्हता. पंतने मात्र असं न करता वेळ घेऊन खेळणे गरजेचे आहे.”

‘माझ्यासाठी आजही टेस्टच नंबर वन’

कपिल देव यांना आजही एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटच्या तुलनेत कसोटी क्रिकेटच अधिक आवडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ”मी कसोटी क्रिकेटचा मोठा फॅन आहे, मला संपूर्ण दिवसाचा खेळ पाहायला फार आवडतं. जर कामामुळे मला एखादा सामना पाहयला नाही मिळाला तर, मी हाईलाइट्स बघतो. असं करुन मी जास्तीत जास्त कसोटी सामन्यांचा आनंद घेतो.”

डब्लूटीसी फायनलसाठी एक अतिरिक्त दिवस

क्रिकेट इतिहासात प्रथमच आयोजित केलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या संघात इंग्लंडमध्ये 18 जून ते 22 जूनच्या दरम्यान खेळवला जाणार आहे. इंग्लंडच्या साउदप्टन येथील मैदानात हा सामना खेळवला जाईल. त्या काळात तेथे पावसाचे वातावरण असण्याची शक्यता असल्याने सामन्यासाठी आयसीसीने 23 जूनचा एक अतिरिक्त दिवस राखीव ठेवला आहे.

हे ही वाचा :

4 डावांत 105 रन्स, 16 बॅट्समन शून्यावर आऊट, एका दिवसांत जिंकली ऑस्ट्रेलियाची टीम, पाहा सनसनाटी मॅच…..

जोफ्रा आर्चर टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार? समोर आली मोठी बातमी

Video : WTC फायनलअगोदर जीममध्ये घाम, रिषभ पंतचा हा स्टंट पाहिला का?

(Dont Do same Mistakes which Rohit Sharma Did Kapil Dev Advice to Rishabh Pant)