भारताविरुद्ध पदार्पण आणि भारताविरुद्धच शेवटची कसोटी, इंग्लंडच्या सर्वांत यशस्वी फलंदाजाची न ऐकलेली कहाणी!

भारताविरुद्ध पदार्पण आणि भारताविरुद्धच शेवटची कसोटी, इंग्लंडच्या सर्वांत यशस्वी फलंदाजाची न ऐकलेली कहाणी!
एलेस्टर कूक

लंडन : भारतीय संघाविरोधात आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करुन यशाची शिखरं गाठनारे अनेक खेळाडू आहेत. पण भारतीय संघाविरोधात पदार्पण करुन भारताविरुद्धच शेवटची कसोटी खेळणारा एक दिग्गज म्हणजे इंग्लंडचा सर्वांत यशस्वी फलंदाज ‘एलेस्टर कूक'(Alastair Cook). तब्बल 6 फुट 2 इंच इतकी उंची असणारा शब्दश: हँडसम दिसणाऱ्या एलेस्टर कूकने 1 मार्च, 2006 रोजी नागपूरात भारतीय संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणाऱ्या कूकने आजच्याच दिवशी सचिन तेंडूलकरचं (Sachin Tendulkar) एक रेकॉर्ड तोडलं होते. (England Cricket team Opener Alastair Cook Youngest Batsman breaks Sachin Record)

alastair cook1

एलेस्टर कूक

इंग्लंड संघाचा माजी कर्णधार असणारा कूक सलग 12 वर्ष इंग्लंड संघाचा सलामीवीर होता. त्याने श्रीलंकेविरुद्ध 30 मे 2016 रोजी पार पडलेल्या कसोटीत 5 धावा करताच दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचा सर्वात कमी वयात 10 हजार धावा करण्याचा रेकॉर्ड तोडला. तब्बल 11 वर्षांपासून असणारा सचिनचा रेकॉर्ड कूकने तोडला. सचिनने 2005 मध्ये 31 वर्षे 326 दिवसांचा असताना 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. कूकने 31 वर्ष 157 दिवसांचा असताना 10 हजार धावा करत हा रेकॉर्ड तोडला. विशेष म्हणजे त्या सामन्यात 47 धावा करत कूकने संघाला विजय देखील मिळवून दिला.

कसोटी पदार्पण आणि शेवटची कसोटी

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर कूक याने 2006 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पणातच तुफान खेळी केली होती. त्याने पहिल्या डावांत अर्धशतक ठोकल्यानंतर दुसऱ्याच डावांत शतकी खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण आल्याची डरकाळी फोडली होती. भारताविरुद्ध पदार्पण करणाऱ्या कूकने 7 सप्टेंबर, 2018 रोजी मायदेशात भारताविरुद्धच शेवटची कसोटी खेळली. योगायोग म्हणजे या सामन्यात देखील त्याने पहिल्या डावांत अर्धशतक आणि दुसऱ्या डावांत 147 धावांची तुफान खेळी केली.

एलेस्टर कूकची कारकिर्द

एलेस्टर कूकने 161 कसोटी सामन्यात 12 हजार 472 धावा केल्या. ज्यामध्ये 33 शतकांचा आणि 57 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटचा विचार करता कूकने 92 सामन्यांत 3 हजार 204 धावां केल्या. ज्यात 5 शतकांचा आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. कूक केवळ 4 टी-20 सामने खेळला असून त्याने त्यात 61 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा :

‘रात्र-रात्रभर झोप लागत नव्हती’, रवींद्र जाडेजाने शेअर केला ‘तो’ अनुभव

गुगलवर विराट कोहली काय सर्च करत असेल?, स्वत:च Google History शेअर केली, पाहा…

कोणत्या बोलरला तू घाबरतो?, विराट कोहलीने सांगितलं दिग्गजाचं नाव

(England Cricket team Opener Alastair Cook Youngest Batsman breaks Sachin Record)