IPL Suspended : भारतात रस्त्यांवर लोकं मरतायत, आयपीएलची स्पर्धा पाहणं चांगलं नाही, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं रोखठोक मत

"देशातल्या परिस्थितीकडे, खेळाडू डोळेझाक करू शकत नव्हते. शेवटी परिस्थितीच अशी झाली होती की बीसीसीआयपुढे आयपीएल 2021 पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता.", असं मत नासीर हुसेन याने व्यक्त केलं. (England Former Captain naseer Hussain Statement On ipl 2021 Suspended)

IPL Suspended : भारतात रस्त्यांवर लोकं मरतायत, आयपीएलची स्पर्धा पाहणं चांगलं नाही, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं रोखठोक मत
नासीर हुसेन, इंग्लंडचा माजी कर्णधार
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 1:15 PM

नवी दिल्ली :  “भारतात वाढत्या कोव्हिड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडे आयपीएलचं 14 (IPL 2021) वं पर्व अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता”, असं मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने व्यक्त केलं आहे. शिवाय “भारतात रस्त्यांवर लोकं मरतायत अशा काळात आयपीएलची स्पर्धा पाहणं चांगलं नाही”, असं रोखठोक मतंही त्याने व्यक्त केलं आहे. तो इंग्रजी वृत्तपत्र ‘डेली मेल’शी बोलत होता. या मुलाखतीत त्याने आयपीएलवर सविस्तर भाष्य केलं. (England Former Captain naseer Hussain Statement On ipl 2021 Suspended)

भारतात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना केसेस आढळून येत आहेत. या प्राणघातक विषाणूने आतापर्यंतच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आयपीएलच्या बायो बबलमध्येही एन्ट्री केली. सोमवारी आणि मंगळवारी लीगमधील काही खेळाडू, अधिकारी सपोर्ट तसंच स्टाफ कोविडपैकी 10 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. साहजिक बीसीसीआयला मोठा निर्णय घ्यावा लागला. आयपीएलचं 14 वं पर्व स्थगित करत असल्याची घोषणा बीसीसीआयने केली.

काय म्हणाला नासीर हुसेन…?

इंग्लंडचा माजी कर्णधार हुसेन म्हणाला, “देशातल्या परिस्थितीकडे, खेळाडू डोळेझाक करू शकत नव्हते. शेवटी परिस्थितीच अशी झाली होती की बीसीसीआयपुढे आयपीएल 2021 पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता.”

खेळाडूंना भारतातल्या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव होती. कदाचित त्यांनी टीव्हीवर पाहिलं असेल की भारतात कोरोनामुळे किती वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीकडे ते डोळेझाक करु शकत नव्हते. लोक ऑक्सिजनवाचून रस्तावर जीव सोडत आहेत, लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयत. अशा काळात आयपीएल खेळणं आणि पाहणं हे निश्चित चांगलं नव्हतं, असं रोखठोक मत नासीर हुसेनने व्यक्त केलं.

कोरोनाचा धुमाकूळ, आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित, बीसीसीआयचा मोठा निर्णय

कोरोनामुळे (Corona) आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या नको असेलेल्या पॉझिटिव्हीटीमध्ये आयपीएलमुळे चाहत्यांचं मनोरंजन होत होतं. मात्र अखेर स्पर्धा स्थगित झाली. यामुळे या मोसमातील उर्वरित सामन्याचं आयोजन केव्हापर्यंत होणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

(England Former Captain naseer Hussain Statement On ipl 2021 Suspended)

हे ही वाचा :

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ क्रिकेटपटूचं बंदुकीचा धाक दाखवून अपहरण अन्…

IPL 2021 : आयपीएल स्थगित झाल्यानंतरची सर्वांत मोठी बातमी, पोलिसांकडून 2 जणांना बेड्या, कारण काय?

IPL 2021 : कोरोनापुढे आयपीएल हरलं पण या खेळाडूंनी क्रिकेट रसिकांच्या हृदयावर राज्य केलं!

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.