WTC Final : भारताचा ‘हा’ खेळाडूच मैदान गाजवणार, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं भाकित

बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला 18 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी (Michael Vaughan) अंतिम सामन्यासंबधी एक महत्त्वाच भाकित केलं आहे.

WTC Final : भारताचा ‘हा’ खेळाडूच मैदान गाजवणार, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं भाकित
ऋषभ पंत

साऊदम्पटन : कसोटी क्रिकेटचा ‘वर्ल्ड कप’ मानला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊदम्पटन (Southampton)येथे खेळवला जाणार आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाला असणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand)या दोघांत हा अंतिम सामना खेळवला जाईल. दरम्यान इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांच्या मते भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा खेळ पाहण्यासारखा असेल आणि भारतीय संघाकडून तो सर्वात उत्कृष्ट कामगिरी करेल असंही वॉन यांनी म्हटलं आहे. (English Cricketer Michael Vaughan Predicts Rishabh Pant Will be Gamechanger In WTC Final)

इंग्लंडचे एक महत्त्वाचे फलंदाज आणि यशस्वी कर्णधार म्हणून वॉन यांची ओळख आहे. आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारे वॉन ही सर्व क्रिकेट प्रेमींप्रमाणे WTC Final साठी उत्सुक असून त्यांनी सामन्याआधीच विविध भाकितं करायला सुरुवात केली आहे. त्यांच्यामते या सामन्यांत दोन्ही संघाकडून मिळून तीन खेळाडू सर्वात चांगली कामगिरी करण्याची दाट शक्यता आहे.

न्यूझीलंडचे दोन तर भारताचा एक

मायकल वॉन यांनी केलेल्या भाकितानुसार भारताकडून ऋषभ पंत मैदान गाजवणार आहे. तर न्यूझीलंडकडून मात्र दोन खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील. कायल जॅमिसन (Kyle Jamieson) आणि बीजे वॉल्टिंग (BJ Walting) अशी या दोघांची नावे आहेत. जॅमिसन एक वेगवान गोलंदाज असून वॉल्टिंग एक उत्कृष्ट फलंदाज आहे.

WTC Final ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर…?

आयसीसीने अंतिम सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन जाहीर केल्या आहेत. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून ट्रॉफी देण्यात येईल, असं आयसीसीने जाहीर केलंय. तसंच 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसात जर 30 तासांचा खेळ शक्य नसल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल.

किवीविरुद्ध भारताचं मिशन 72 तास

क्रिकेटच्या सामन्यांची रणनीती ही शक्यतो मैदानावर सराव करताना आखली जाते. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल

कोण आहेत मायकल वॉन ?

सुमारे 6 फुट 2 इंच उंची असणारे धिप्पाड असे इंग्लंडचे माजी खेळाडू मायकल वॉन इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखले जातात. त्याचे कारण वॉन यांनी अॅशेस सिरीजमधील ऑस्ट्रेलियाची सलग 9 वर्षांची विजयी साखळी तोडली होती. 1986 नंतर इंग्लंडला अॅशेस सिरीजमध्ये एकही विजय मिळवता येत नव्हता, त्यावेळी 9 वर्षानंतर 2005 साली वॉन यांनी इंग्लंडला विजय मिळवून दिला.

संबधित बातम्या :

World Test Championship: न्यूझीलंडविरुद्ध द्रविडची बॅट आग ओकायची, राहुलचे शिष्य किवींना आस्मान दाखवणार?

WTC Final: न्यूझीलंडला मात देण्यासाठी भारतीय संघाचा ‘सिक्रेट प्लॅन’, 72 तासांच विशेष मिशन

‘नाद करा पण माझा कुठं…’ म्हणण्याची आर. अश्विनला संधी, WTC फायनलमध्ये विक्रम करणार?

(English Cricketer Michael Vaughan Predicts Rishabh Pant Will be Gamechanger In WTC Final)