Wriddhiman Saha : साहाला धमकी देणं महागात! बोरिया मुझुमदारवर लागू शकते 2 वर्षांची बंदी

पत्रकार बोरिया मजुमदार यांनी भारतीय क्रिकेटर रिद्धिमान साहाला मुलाखतीसाठी नकार दिल्याने धमकी दिली होती. त्यांना आता ते चांगलंच महागात पडणार असल्याचं दिसतंय.

Wriddhiman Saha : साहाला धमकी देणं महागात! बोरिया मुझुमदारवर लागू शकते 2 वर्षांची बंदी
साहाला धमकी देणाऱ्या बोरिया मुझुमदारवर दोन वर्षांची बंदीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 5:32 PM

मुंबई : भारतीय यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) मुलाखतीसाठी धमकावणाऱ्या पत्रकार बोरिया मजुमदारवर (boriya mazumdar) बीसीसीआय (BCCI) दोन वर्षांची बंदी घालू शकते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीसीसीआयने तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीने या प्रकरणात मजुमदार यांना दोषी ठरवले असून आता त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. साहाला भारताच्या कसोटी संघातून वगळल्यानंतर मजुमदार यांना या विषयावर त्याच्याशी बोलायचे होते. परंतु मजुमदार यांनी नकार दिल्याने संतापले आणि त्यांनी कधीही मुलाखत न घेण्याची धमकी दिली. एक माध्यमाच्या रिपोर्टनुसार, बोरिया मजुमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली जाऊ शकते. त्यांना कोणत्याही स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. बीसीसीआयशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा समावेश होणार नाही. त्याचबरोबर सर्व खेळाडूंना बोरिया मजुमदार यांच्याशी बोलण्यासही मनाई करण्यात येणार आहे.

नेमकं काय प्रकरण?

श्रीलंकेविरुद्धच्या T20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने 19 फेब्रुवारीला केली होती. मात्र अनुभवी यष्टिरक्षक ऋद्धिमान साहाला त्यात स्थान मिळाले नाही. यानंतर एका पत्रकाराने साहा यांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून मुलाखतीची मागणी केली. ज्याला साहा यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पत्रकाराकडून त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा स्क्रीनशॉट आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत साहाने नाराजी व्यक्त केली होती.

पत्रकार काय म्हणाले?

पत्रकाराने साहा यांना लिहिलंय की, ‘तुम्ही फोन केला नाही. मी तुमची यापुढे कधीही मुलाखत घेणार नाही. मला अपमान सहन होत नाही आणि मला ते लक्षात राहील. तुम्ही असे करायला नको होते.’

साहाने ट्विटरवर पोस्ट केला स्क्रीनशॉट

या संभाषणाचे स्क्रीनशॉट साहाने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलंय. यानंतर अनेक क्रिकेट दिग्गजांनी साहाला पाठिंबा देत बीसीसीआयकडे याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली. यादरम्यान साहा यांना धमकी देणारे पत्रकार बोरिया मजुमदार असल्याचे उघड झाले. चौकशी समितीने त्याला दोषी ठरवले असून आता त्याच्यावर कारवाई होऊ शकते. बोरिया मजुमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली जाऊ शकते. त्यांना कोणत्याही स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. बीसीसीआयशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा समावेश होणार नाही. त्याचबरोबर सर्व खेळाडूंना बोरिया मजुमदार यांच्याशी बोलण्यासही मनाई करण्यात येणार आहे.

इतर बातम्या

Video : तळोजा जेलबाहेर राणा दाम्पत्यांविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

राणा दांपत्यांविरोधात राजद्रोहाचे कलम लागले; तुम्हाला माहितीय का राजद्रोह लागला तर ‘जन्मठेपही’ होऊ शकते

Video : कडव्या शिवसैनिक आजी मुख्यमंत्र्याच्या भेटीला, पुन्हा झुकेंगे नहींचा डबल धमाका

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.