Birthday Special : मुंबई इंडियन्सचा कोच, श्रीलंकेचा रेकॉर्डवीर, क्रिकेटमध्ये मोठे रेकॉर्ड

हा खेळाडू भारताविरुद्ध खेळताना बॅटमधून अक्षरश: आग ओकायचा. प्रत्येक सामन्यांनतर आपल्या खेळाला एका नव्या उंचीवर घेऊन जात होता.

Birthday Special : मुंबई इंडियन्सचा कोच, श्रीलंकेचा रेकॉर्डवीर, क्रिकेटमध्ये मोठे रेकॉर्ड
महेला जयवर्धने

कोलंबो : क्रिकेट जगतातील काही सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणला जाणारा श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेचा (Former Sri lanka Cricketer Mahela Jayawardene ) आज वाढदिवस. माहेलाचा जन्म 27 मे 1977 रोजी कोलंबो येथे झाला. त्याने आपल्या कारकिर्दीत श्रीलंकेकडून खेळताना 647 सामन्यांत 25 हजार 917 धावा ठोकल्या आहेत. ज्यात कसोटी आणि वनडेतील 54 शतकांचा आणि 136 अर्धशतकांचा समावेश आहे. माहेलाच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. यात श्रीलंकेकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्यासह एका सामन्यांत सर्वात मोठी धावसंख्याही माहेलाच्या नावावर आहे. 2006 साली त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांत एका डावांत तब्बल 374 धावा ठोकल्या होत्या. (Former Sri lanka Cricketer Mahela Jayawardene Birthday Who Holds various Records)

कसोटी क्रिकेटमधील कारकीर्द

माहेला जयवर्धने हा श्रीलंकेचा पहिला खेळाडू आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने आपल्या कारकिर्दीत 149 कसोटी सामन्यांत 49.84 च्या सरासरीने 11 हजार 814 धावां ठोकल्या ज्यात 34 शतकांचा समावेश होता. यासोबतच महेलाने 448 एकदिवसीय सामन्यांत 33.37 च्या सरासरीने 12 हजार 650 धावा केल्या ज्यात 19 शतकांचा समावेश आहे.

‘पार्टनरशिप स्पेशलिस्ट’

माहेला खेळपट्टीवर असताना सोबती फलंदाजासोबत भागीदारी करण्यातही तितकाच सरस होता. त्याने अनेक कसोटी सामन्यांत मोठ-मोठ्या भागीदाऱ्या केल्या आहेत. ज्यात कुमार संगकारासोबतची 624 धावांची भागीदारी कसोटी क्रिकेटमधली सर्वांत मोठी आहे. त्याचसोबत चौथ्या विकेटसाठी  तिलन समरवीरासोबत 437 धावांची, प्रसन्ना जयवर्धनसोबत सहाव्या विकेटसाठी 351 धावांची भागीदारीही माहेलाने केली आहे.

श्रीलंकेकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने

एकदिवसीय सामन्यांचा विचार करता माहेलाने श्रीलंकेकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने 448 एकदिवसीय सामन्यांत 12 हजार 650 धावा केल्या आहेत. ज्यातील 2 हजार 666 धावा या एकट्या भारताविरुद्ध केल्या आहेत.  याशिवाय 200 हून अधिक झेल घेणारा ही तो एकमेव श्रीलंकन खेळाडू असून त्याच्या नावावर 218 झेल आहेत. विशेष म्हणजे वर्ल्डकपच्या फायनल आणि सेमी फायनलमध्ये शतक ही माहेलाने झळकावले आहे.

श्रीलंका टीमला ‘अच्छे दिन’

माहेला जयवर्धने खेळत असताना श्रीलंकेच्या संघाकडे जागतिक क्रिकेटमधील एक बलशाली संघ म्हणून पाहिले जायचे. जयवर्धनेच्या काळात श्रीलंकेचा संघ 2007 आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला होता. तसेच 2009, 2012 च्या टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्येही श्रीलंकेनी धडक घेतली होती. त्यानंतर 2014 मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातही महेला होता.

संबधित बातम्या

4 डावांत 105 रन्स, 16 बॅट्समन शून्यावर आऊट, एका दिवसांत जिंकली ऑस्ट्रेलियाची टीम, पाहा सनसनाटी मॅच…..

जोफ्रा आर्चर टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार? समोर आली मोठी बातमी

Video : WTC फायनलअगोदर जीममध्ये घाम, रिषभ पंतचा हा स्टंट पाहिला का?

(Former Sri lanka Cricketer Mahela Jayawardene Birthday Who Holds various Records)