Jasprit Bumrah | दिग्गज क्रिकेटपटू ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहचा दिवाना, म्हणाला…

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टीम इंडियाचा प्रमुख आणि महत्वाचा गोलंदाज आहे. त्याने अनेकदा भारताला एकहाती विजय मिळवून दिला.

Jasprit Bumrah | दिग्गज क्रिकेटपटू 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराहचा दिवाना, म्हणाला...
Jasprit Bumrah
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 7:31 PM

मुंबई | जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टीम इंडियाचा ‘यॉर्कर किंग’ आणि हुकमाचा एक्का. बुमराहने गेल्या काही वर्षांपासून यशस्वीरित्या प्रमुख गोलंदाजाची भूमिका पार पाडली आहे. बुमराह डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. त्याने अनेकदा टीम इंडियाला एकहाती विजय मिळवून दिला आहे. बुमराहने कमी कालावधीत यशस्वी झाला आहे. त्याने आपल्या कामगिरीने अनेक किर्तीमान केले आहे. बुमराहचे देश-विदेशात अनेक चाहते आहेत. त्यामध्ये आणखी एका दिग्गज चाहत्याची वाढ झाली आहे. बुमराहने आपल्या गोलंदाजीने वेस्टइंडिजचे माजी वेगवान गोलंदाज कर्टली एम्ब्रोस (Curtly Ambrose) यांना मोहिनी घातली आहे. तसेच कर्टलीने बुमराहचं कौतुक केलं आहे. (former west indies player curtly ambrose praised jasprit bumrah)

कर्टली काय म्हणाले?

“बुमराहने पुढच्या काळात स्वत:ला फिट ठेवलं तर तो कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेऊ शकतो. भारताकडे अनेक चांगले वेगवान गोलंदाज आहेत. पण मी बुमराहच चाहता आहे. बुमराह निर्णायक भूमिका बजावतो. त्याला पुढेही अशीच शानदार कामगिरी करताना पाहायचंय”, असं कर्टली म्हणाले. ते एका युट्युब चॅनेलशी संवाद साधत होते. यावेळस त्यांनी हे वक्तव्य केलं. “बुमराहला स्विंग आणि सीम करण्याची कला अवगत आहे. तसेच तो उत्तम यॉर्कर टाकतो. तो जोवर क्रिकेट खेळेल तोवर त्याने 400 विकेट्सचा टप्पा ओलांडेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शॉर्ट रनअप धोकादायक

दरम्यान कौतुकासह कर्टली यांनी बुमराहबाबत चिंता व्यक्त केली. “बुमराह गोलंदाजीसाठी शॉर्ट रनअप घेतो. या शॉर्ट रनअपमुळे त्याला दुखापत होण्याची शक्यता असते. चेंडू टाकताना अपेक्षित वेग हवा असतो. बुमराह चेंडू टाकण्याआधी 2-3 वेळा जॉग करतो. याचा थेट परिणाम बुमराहच्या शरीरावर होतो. त्यामुळे बुमराहने पुढील काळात बुमराहने शारिरकरित्या तंदुरुस्त रहावं लागेल”, अशी भिती कर्टली यांनी व्यक्त केली.

टीम इंडिया अवघ्या काही दिवसांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यासाठी जाणार आहे. या दोन्हीसाठी बुमराहची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी बुमराहकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

संबंधित बातम्या :

PHOTO | विजेतेपदासाठी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने, ‘या’ खेळाडूंमध्ये रंगणार सामना

टीम इंडियाच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह, माजी क्रिकेटपटूकडून WTC FINAL साठी निवड झालेल्या संघाबाबत शंका व्यक्त

(former west indies player curtly ambrose praised jasprit bumrah)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.