हरभजन सिंग ‘त्या’ इन्स्टाग्राम पोस्टवरुन वादाच्या भोवऱ्यात, माफी मागितल्यानंतरही कारवाईची मागणी
भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन एका वादग्रस्त पोस्टमुळे वादात अडकला आहे. त्याच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
चंदीगढ : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या पोस्टसाठी त्याला माफीही मागावी लागली आहे. हरभजनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कुख्यात खालिस्तानी दहशतवादी जरनैल सिंग भिंडरावालासह (Jarnail Singh Bhindranwale) त्याच्या साथीदारांचा पोस्ट असणारा फोटो टाकला होता. त्यावर ‘शहीदांना सलाम’ असं कॅप्शनही दिलं होतं. या पोस्टमुळे हरभजनवर टीकांची झुंबड उडाली. त्यानंतर सोमवारी 7 जूनला हरभजनने एक ट्विट करत माफी मागितली आहे. (Harbhajan Singh Apologises For Controversial Instagram Post Related to Khalistan Terrorists)
1 जून ते 8 जून 1984 च्या दरम्यान अमृतसरच्या पवित्र हरमिंदर सिंग गुरुद्वारा अर्थात सुवर्ण मंदिरावर खालिस्तानी दहशतवाद्यांनी कब्जा केला होता. यावेळी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवत या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यावेळी भिंडरावालासह त्याचे साथीदार मारले गेले होते. याच गोष्टीला 37 वर्ष झाल्यानंतर त्याबाबत पोस्ट करत हरभजनने भिंडारवाला आणि त्याच्या साथीदार दहशतवाद्यांना शहिद म्हणत त्यांना आदराजंली वाहिली होती.
‘ती’ वादग्रस्त पोस्ट
हरभजन सिंगने पोस्टमध्ये भिंडरावाला आणि अन्य दहशतवाद्यांचा फोटो टाकला ज्याला पंजाबी भाषेत कॅप्शन लिहीले की, ‘श्री हरमिंदर साहिब गुरुद्वाऱ्यात 1 जून ते 6 जून 1984 मध्ये पार पडलेल्या ऑपरेशनमध्ये मरणाऱ्यांना हार्दीक श्रद्धांजली.’ ही पोस्ट हरभजनने त्याच्या स्टोरीला टाकली होती. काही वेळातच ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आणि हरभजनवर अनेकांनी टीका केली.
हरभजनला मागावी लागली माफी
वाद वाढल्यानंतर हरभजनने ट्विटरवर एक पोस्ट टाकत माफी मागितली. ज्यात लिहिलं ”मी कालच्या माझ्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन माफी मागू इच्छितो. मला तो फोटो व्हॉट्सअॅपवर आला होता. मी नीट न पाहता लगेचच पोस्ट केला.” तसच पुढे हरभजनने लिहिलं की मी संबधित व्यक्ती आणि त्यांच्या विचारांच समर्थन करत नाही.
My heartfelt apology to my people..?? pic.twitter.com/S44cszY7lh
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 7, 2021
हे ही वाचा :
IPL 2021 Schedule : आयपीएलच्या नव्या तारखा ठरल्या, दसऱ्याला फायनल!
IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय
आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची तारीख ठरली, पण BCCI पुढे ही सर्वांत मोठी अडचण!
(Harbhajan Singh Apologises For Controversial Instagram Post Related to Khalistan Terrorists )