WTC Final : भारताचे ‘हे’ दोन खेळाडू न्यूझीलंडसाठी मोठा धोका, फलंदाज हेन्री निकोल्सने वर्तवली चिंता

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand)यांच्यात 18 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship)अंतिम सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागूल राहिले आहे.

WTC Final : भारताचे 'हे' दोन खेळाडू न्यूझीलंडसाठी मोठा धोका, फलंदाज हेन्री निकोल्सने वर्तवली चिंता
Team India

साउथॅम्प्टन : बहुप्रतीक्षीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्याला भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून इंग्लंडच्या साउथॅम्प्टन (Southampton) येथे
सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ अंतिम सामन्याच्या तयारीला लागले असून एकमेंकाविरुद्ध रणनीती आखण्यात दोन्ही संघ व्यस्त आहेत. दरम्यान न्यूझीलंड संघाचा सलामीवीर हेन्री निकोल्स (Henry Nicholls) याने भारताच्या दोन खेळाडूंकडून न्यूझीलंडला सर्वाधिक धोका असल्याचं त्यानं म्हटलं आहे. रवीचंद्रन आश्विन (R Aswhin) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) अशी या दोघा खेळाडूंची नावे आहेत. (Henry Nicholls says focus on R ashwin and Ravindra Jadeja in India vs New Zealand WTC Final)

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) पहिल्या दोन क्रमांकावर असणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाकडे तगडे खेळाडू असल्याने सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे. भारताकडे वेगवान आणि फिरकीपटू अशा दोन्ही प्रकारचे गोलंदाज आहेत. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजासमोर आर. आश्विन आणि जाडेजा या फिरकीपटूंचे मोठे आव्हान असणार आहे, असं हेन्री निकोल्सनं म्हटलं आहे.

वेगवान गोलंदाजात ‘काटें की टक्कर’

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाकडे सध्या जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत, असे सांगताना निकोल्स म्हणाला ”भारताकडे आश्विन, जाडेजासारखे फिरकीपटू असून जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah), मोहम्मद शमी (Mohammad Shami), इशांत शर्मा (Ishant Sharma) यांच्यासारखे वेगवान गोलंदाज आहेत. जे आमच्या ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult), टीम साउदी (Tim Southee) आणि नील वॅगनरच्या (Neil wagner) तुलनेचे आहेत. हेन्रीने पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली.

फिरकीपटूंसाठी खास रणनीती

भारताच्या फिरकीपटूंचा न्यूझीलंडने चांगलाच धसका घेतला आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डेवन कॉन्वेने खेळपट्टीवर मातीचा अधिक थर टाकून फिरकीपटूंना साजेशा खेळपट्टीवर प्रॅक्टीस सुरु केली. ज्याचे हेन्री निकोल्सने समर्थन करत न्यूझीलंडच्या फलंदाजाना फिरकीपटूंविरुद्ध खास रणनीती आखण्याची गरज असल्याच म्हटंल.

हेन्री निकोल्स विरुद्ध भारत

हेन्री हा न्यूझीलंड संघाचा सलामीवीर आहे. त्याने न्यूझीलंडकडून 37 कसोटी सामन्यांत 43.91 च्या सरासरीने 2 हजार 152 धावा केल्या आहेत. ज्यात 7 शतकांचाही समावेश आहे. भारताविरुद्ध हेन्री काही खास कामगिरी करु शकला नसून तीन कसोटी सामन्यांत त्याने केवळ 61 धावाच केल्या आहेत.

संबंधित बातम्या 

सुनील शेट्टीची लेक KL Rahul च्या फिटनेसवर फिदा, फोटोवर कमेंट करुन म्हणाली…

Photo : ‘अरे बाबांनो मी तिचा मालक नाहीय’, इरफान खान बायकोच्या त्या फोटोवरुन ट्रोलर्सवर भडकला

Video : है तय्यार हम! भारतीय क्रिकेटपटूंचा सराव जोमात सुरु

(Henry Nicholls says focus on R ashwin and Ravindra Jadeja in India vs New Zealand WTC Final)