तीन द्विशतकं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 शतकं, रोहित शर्माच्या पहिल्या शतकाची भन्नाट कहाणी!

भारताचा हा सलामीवीर सध्या संघातील सर्वात स्फोटक फलंदाज आहे. त्याचे अनेक रेकॉर्डस आजही कोणता खेळाडू तोडू शकलेला नाही.

तीन द्विशतकं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 शतकं, रोहित शर्माच्या पहिल्या शतकाची भन्नाट कहाणी!
रोहित शर्मा

मुंबई : भारतीय संघाचा महत्त्वाचा फलंदाज हिटमॅन रोहित शर्माने (Hitman Rohit Sharma) आतापर्यंत आपल्या फलंदाजीतून गोलंदाजाना अक्षरश: धु-धू धुतले आहे. अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करणाऱ्या आणि तिन्ही प्रकारांत मिळून 40 शतकं झळकावणाऱ्या रोहितने आजच्याच दिवशी आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. आजपासून 11 वर्षांपूर्वी झिम्बॉम्बे ( Zimbabwe) येथील बुलावायो क्रिकेट स्टेडियममध्ये (Bulawayo Cricket Stadium) झिम्बॉम्बे संघाविरोधात रोहितने हे शतक ठोकले होते. रोहितने 119 चेंडूत 114 धावा ठोकत पहिल्या-वहिल्या शतकाला गवासणी घातली होती.  (Hitman Rohit Sharma Smashes First Ever International Century in cricket match)

रोहित शर्माच्या नावावर बरेच रेकॉर्ड आहेत. यातील दोन महत्त्वाचे रेकॉर्ड म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितने तीन दुहेरी शतकं ठोकली आहेत. तसेच 264 ही त्याने केलेली धावसंख्या आजही एकदिवसीय क्रिकेटमधील एका खेळाडू करुन करण्यात आलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

रोहित शर्माची कारकीर्द

उजव्या हाताचा फलंदाज असणाऱ्या रोहित शर्माने 20 वर्षाच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 23 जून 2007 रोजी तो आयर्लंड विरोधात पहिला एकदिवसीय सामना खेळला. आजपर्यंत तिन्ही प्रकारांत मिळून रोहित 376 आतंरराष्ट्रीय सामने खेळला आहे. ज्यात त्याने 14 हजार 684 धावा केल्या आहेत. यामध्ये 40 शतकांसह 77 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय रोहितने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत मिळून 4 दुहेरी शतकही झळकावली आहेत. रोहित सुरुवातीच्या काळात गोलंदाजी देखील करायचा, मात्र त्यानंतर त्याने फलंदाजीवर सर्व लक्ष केंद्रीत केल्यामुळे त्याने गोलंदाजी करण सोडून दिलं. विशेष म्हणजे रोहितने आयपीएलमध्ये हैद्राबाद संघाकडून खेळताना हॅट्रीक देखील घेतली आहे.

मुंबई इंडियन्स संघाकडून अभिनंदन

रोहित शर्मा इंडियन प्रिमीयर लीगमधील (IPL) सर्वांत यशस्वी संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. त्याने 2013, 2015, 2017,2019 आणि 2020 या वर्षांत संघाला विजय मिळवून देत 5 आयपीएल ट्रॉफी मुंबई इंडियन्सच्या खात्यात जमा केली आहेत. दरम्यान मुंबईच्या संघाने आपल्या लाडक्या कर्णधाराचे सोशल मीडियवर पोस्ट करत अभिनंदन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

संबधित बातम्या :

क्रिकेटला रामराम ठोकून कोण पोलीस बनलं, कोण पत्रकार तर कोण पायलट!, वाचा खास….

Sagar Dhankhar Murder: जमिनीवर पडलेला सागर हात जोडत होता, सुशील कुमार दंडुक्याने मारत होता, मर्डरदिवशीचा Video व्हायरल

T-20 World Cup 2021 : चार संघ स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणार तर विश्चचषक ‘हा’ संघ जिंकणार, पाकच्या खेळाडूचं भाकित

(Hitman Rohit Sharma Smashes First Ever International Century in cricket match)