ICC Womens t20 WC: शेवटच्या चेंडूवर फिल्डरच्या चूकीमुळे जिंकलेली मॅच हरली, कसं ते या VIDEO मध्ये बघा

अटीतटीच्या सामन्यात एखाद्या फिल्डरकडून अशी चूक कुठल्याही टीमला कशी परवडेल?

ICC Womens t20 WC: शेवटच्या चेंडूवर फिल्डरच्या चूकीमुळे जिंकलेली मॅच हरली, कसं ते या VIDEO मध्ये बघा
uae vs zimbabwe Image Credit source: icc twitter
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 6:31 PM

मुंबई: क्रिकेटच्या सामन्यात अनेकदा रोमांचक क्षण अनुभवता येतात. अटी-तटीच्या सामन्यात हा रोमांच टीपेला पोहोचतो. सध्या आयसीसी वुमेन्स टी 20 वर्ल्ड कप क्वालिफायरचे सामने सुरु आहेत. बुधवारी यूएई आणि झिम्बाब्वेमध्ये खूपच अटी-तटीचा सामना झाला. यूएईने झिम्बाब्वेच्या टीमला शेवटच्या चेंडूवर हरवलं. या मॅचमध्ये यूएईला विजयासाठी 121 धावांची आवश्यकता होती.

शेवटच्या चेंडूवर यूएईला विजयासाठी 4 धावांची गरज होती. यूएईचे 6 विकेट गेले होते. झिम्बाब्वेचा विजय निश्चित मानला जात होता. पण शेवटच्या चेंडूवर फिल्डरच्या चुकीमूळे यूएईची टीम जिंकली.

लास्ट ओव्हरमध्ये काय स्थिती होती?

लास्ट ओव्हरमध्ये यूएईला विजयासाठी 14 धावांची आवश्यकता होती. झिम्बाब्वेने नोमविलो सिबांडाकडे चेंडू सोपवला. पहिल्या चार चेंडूंवर सिबांडाने फक्त चार धावा दिल्या. पाचव्या चेंडूवर सिंबाडाकडून चूक झाली. तिने वाइड चौकार दिला. त्यानंतर शेवटच्या दोन चेंडूंवर यूएईला विजयासाठी 6 धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर 15 वर्षाच्या वैष्णव महेशने 2 धावा काढल्या.

शेवटच्या चेंडूवर फील्डरकडून मिसफील्ड

शेवटच्या बॉलवर यूएईला विजयासाठी 4 धावांची गरज होती. सिंबाडाने चांगला चेंडू टाकला. चेंडू मेहशच्या बॅटला आतल्याबाजूला लागला व फाइन लेगला गेला. तिथे उभ्या फिल्डरने खूपच खराब फिल्डिंग केली. तिने तो चेंडू सोडला. चेंडू पायांच्या मधून थेट सीमारेषेपार गेला. यूएईला चार रन्स मिळाले. अशा प्रकारे झिम्बाब्वेने जिंकायचा सामना हरला.

कुठली टीम कुठल्या स्थानावर

आयसीसी वुमेन्स टी 20 वर्ल्ड कप क्वालिफायर 2022 मध्ये झिम्बाब्वे आणि यूएईची टीम ग्रुप बीमध्ये आहे. झिम्बाब्वेला टुर्नामेंटमध्ये पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी 3 पैकी 2 सामने जिंकलेत. गुणतालिकेत ते पहिल्या स्थानावर आहेत. यूएईच्या टीमने 3 पैकी पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला. ते शेवटच्या स्थानावर आहेत. थायलंड आणि पापुआ न्यू गिनीची टीम दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.