Border Gavskar Trophy | टेस्ट सीरिज बरोबरीत सुटल्यास ट्रॉफीचा मानकरी कोण?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात ब्रिस्बेनमध्ये बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना खेळण्यात येत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:10 PM, 17 Jan 2021
Border Gavskar Trophy | टेस्ट सीरिज बरोबरीत सुटल्यास ट्रॉफीचा मानकरी कोण?
बॉर्डर गावसकर ट्रॉफी

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs Team India) यांच्यात बॉर्डर गावसकर मालिकेतील (Border Gavskar Trophy 2020-21) चौथा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. चौथा कसोटी सामन्यात आतापर्यंत दोन्ही संघ बरोबरीत आहेत. तर 4 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. ही चौथी कसोटी जो संघ जिंकेल तो ही मालिका जिंकेल. तसेच साधारणपणे मालिका बरोबरीत राहिल्यास दोन्हा संघांच्या कर्णधारांना देण्यात येते. पण या बॉर्डर गावसकर मालिकेबाबत नियम जरा वेगळे आहेत. समजा जर ही मालिका बरोबरीत राहिली तर ट्रॉफी कोणाला मिळणार, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. जर ही मालिका बरोबरीत सुटली तर मालिका कोणाला मिळणार हे आपण जाणून घेणार आहोत. (if border gavskar trophy 2020-21 will draw after team india retain this trophy)

बॉर्डर गावसकर मालिकेबद्दल काही नियम आहेत. या नियमांनुसार मालिका अनिर्णित राहिल्यास कोणता संघ ट्रॉफीचा मानकरी ठरणार, याची तरतूद करण्यात आली आहे. ही मालिका बरोबरीत सुटली, तर याआधीच्या बॉर्डर गावसकर मालिकेचा विजयी संघ कोणता, हे पाहिलं जातं. याआधीच्या मालिकेतील दोन्ही संघांची कामगिरी पाहिली जाते. त्यानुसार  गत मालिकेत विजयी ठरलेल्या संघाला ही ट्रॉफी देण्यात येते. म्हणजेच या नियमानुसार समजा ही मालिका बरोबरीत सुटली तरी ट्रॉफी ही टीम इंडियालाच मिळणार. कारण टीम इंडियाने 2018-19 मधील 4 सामन्यांच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत कांगारुंचा 2-1 च्या फरकाने पराभव केला होता.

….या दिग्गजांच्या नावावरुन मालिकेचं नामकरण

बॉर्डर आणि गावसकर हे ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाचे माजी दिग्गज खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलियाचे अॅलेन बॉर्डर आणि टीम इंडियाचे लिटील मास्टर सुनील गावसकर. या दोघांनी कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात खेळण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेला या दोघांचं नाव देण्यात आलं आहे.

या कसोटी मालिकेचं आयोजन आलटून पालटून ऑस्ट्रेलिया आणि भारतात करण्यात येतं. या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील ही आतापर्यंतची 15 वी मालिका आहे. या ट्रॉफीचं 1996-97 मध्ये पहिल्यांदा भारतात आयोजन करण्यात आलं होतं. ही एकूण 1 सामन्यांची मालिका होती. हा एकमेव सामना जिंकून टीम इंडियाने ही मालिका जिंकली होती.

आतापर्यंत एकूण 14 मालिका खेळण्यात आल्या आहेत. तर सुरु असलेली 15 वी मालिका आहे.  यामध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 14 पैकी एकूण 8 वेळा बॉर्डर गावसकर मालिकेवर आपलं नाव कोरलं आहे. तर ऑस्ट्रेलियानेही 5 वेळा मालिका जिंकली आहे. तर फक्त एकदाच ही मालिका बरोबरीत राहिली होती. 2003-04 मध्ये या मालिकेचं आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आलं होतं. ही एकूण 4 सामन्यांची मालिका होती. या मालिकेतील प्रत्येकी 1 सामना दोन्ही संघांनी जिंकला होता. तर इतर 2 सामने हे अनिर्णित राहिले होते.

…तर टीम इंडियाचा हॅटट्रिक मालिका विजय

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया यांच्यातील सामना अनिर्णित राहिल्यास नियमांनुसार मालिका टीम इंडियाकडेच कायम राहिल. त्यामुळे टीम इंडियाची ही हॅटट्रिक ठरेल. टीम इंडियाने याआधी 2016-17 आणि 2018-19 मधील 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला होता. 2016-17 मधील या कसोटी मालिकेचे आयोजन भारतात तर 2018-19 मधील मालिकेचे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आले होते. यामुळे टीम इंडिया हॅटट्रिक साजरी करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 4th Test | बोलिंगने कमाल, बॅटिंगने धमाल, शार्दुल-सुंदरची रेकॉर्ड कामगिरी

Aus vs Ind 4th Test | शार्दूल-वॉशिंग्टनची शानदार खेळी, ब्रिस्बेनवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

Aus vs Ind 4th Test | कांगारुंवर 36 वर्षांनंतर टांगती तलवार, नामुष्की टाळण्यासाठी एकच संधी

(if border gavskar trophy 2020 21 will draw after team india retain this trophy)