IND vs BAN : बांगलादेशचे धाबे दणाणले, बांगलादेशसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या मॅचविनरची रॉयल एन्ट्री, गंभीरचा खास माणूस!
टीम इंडिया आणि बांगालदेशविरूद्धच्या कसोटी मालिकेआधी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियामध्ये असा खेळाडू आलाय, ज्यामुळे बांगालादेशचे धाबे दणाणले आहेत. कोण असेल जाणून घ्या.
बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया चेन्नईमध्य दाखल झाली आहे. पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला सुरू होणार असून टीम इंडियाने सरावाला सुरूवात केली आहे. बीसीसीआयने फोटो पोस्ट केले असून यामध्ये एक नवीन चेहरा दिसत आहे. हा चेहरा बांगलादेशसाठी कर्दनकाळ ठरणारा असून तो कोच गौतम गंभीरचा खास माणूस आहे.
बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेआधी टीममध्ये तगड्या प्लेयरची एन्ट्री झाली आहे. गौतम गंभीरचा हा खास बोलला जाणारू दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिंग कोच मोर्ने मोर्कल आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू मोर्कल आता टीम इंडियाचा बॉलिंग कोच असणा आहे. टीम इंडियाच्या कोचपदी गौतमची निवड झाल्यावर त्याने बॅटींग आणि बॉलिंग कोच म्हणून दोन नावांची मागणी केली होती. यामधील एक म्हणजे मोर्कल असून त्याची टीम इंडियाच्या बॉलिंग कोचपदी निवड झाली आहे.
टीम इंडियाचा बॉलिंग कोच असलेला मोर्ने मोर्कल याआधी पाकिस्तान संघाचा बॉलिंग कोच राहिला आहे. मोर्ने मोर्कलच्या अनुभवाचा फायदा टीम इंडियाच्या युवा गोलंदाजांना होतो. आफ्रिकेच्या घातक गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. बांगलादेशसाठी वाईट बातमी असून टीम इंडियाचे गोलंदाज त्याच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतील. बीसीसीआयने जाहीर केलेल्या टीममधील मोहम्मद सिराज, आकाश दीप और यश दयाल यांच्यासाठी चांगली बातमी आहे.
मोर्ने मोर्कल हा पाकिस्तान संघाचाही बॉलिंग कोच राहिला आहे. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या ताफ्यात 2022-23 मध्ये तो कोच म्हणूम काम पाहत होता. तर साउथ अफ्रीका 20 लीगमध्ये डरबन सुपर जायंट्स संघाचा मुख्य कोच म्हणून कम पाहत होता.
Adding 𝘮𝘰𝘳(𝘯)𝘦 firepower to the coaching staff! 🔥#TeamIndia‘s new bowling coach ➡️ Morne Morkel! 💪#MorneMorkel #SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/AXh5zVtzfb
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 13, 2024
मोर्ने मोर्कलने कसोटी क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप पाडली आहे. अवघ्या 86 सामन्यामध्ये त्याने 309 विकेट घेतल्या आहे. यामध्ये 23 धावांत 6 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिल होती. 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये 188 विकेट घेतल्या आहेत. तर 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 47 विकेट घेतल्या आहेत.