IND vs NZ: पहिल्या ODI मध्ये न्यूझीलंडला दणका, टीम इंडियाचा मोठा विजय

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या विजयात हे खेळाडू चमकले

IND vs NZ: पहिल्या ODI मध्ये न्यूझीलंडला दणका, टीम इंडियाचा मोठा विजय
संजू सॅमसन
Image Credit source: social
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 22, 2022 | 5:49 PM

मुंबई: टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सीरीज खेळत आहे. त्याचवेळी इंडिया ‘ए’ ची न्यूझीलंड ‘ए’ विरुद्ध वनडे मालिका सुरु आहे. आज चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियमवर वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. इंडिया ए ने या पहिल्या वनडे मॅचमध्ये न्यूझीलंड ए वर 7 विकेट आणि 109 चेंडू राखून विजय मिळवला. इंडिया ए कडून शार्दुल ठाकूर, कुलदीप सेन, रजत पाटीदार आणि ऋतुराज गायकवाडने दमदार कामगिरी केली.

कुलदीप सेनची शार्दुलला साथ

इंडिया ए च्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंड ए चा डाव 167 धावात आटोपला. शार्दुल ठाकूरने 8.2 षटकात 32 धावा देत 4 विकेट काढल्या. त्याला कुलदीप सेनने चांगली साथ दिली. कुलदीपने 7 ओव्हरमध्ये 30 धावा देऊन तीन विकेट काढल्या. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. त्यांना डोकं वर काढण्याची संधी दिली नाही.

किती धावात न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत?

न्यूझीलंडकडून लोअर ऑर्डरमधील फलंदाज मायकल रिपॉनने सर्वाधिक 61 धावा केल्या. शार्दुल ठाकूरने त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडलं. शार्दुल ठाकूर-कुलदीप सेन जोडीने सुरुवातीपासूनच न्यूझीलंडला धक्के दिला. अवघ्या 27 धावात न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता. न्यूझीलंडची टीम या धक्क्यांमधून सावरुच शकली नाही. 40.2 ओव्हर्समध्ये 167 धावात त्यांचा डाव आटोपला.

पृथ्वी-ऋतुराजने किती धावा केल्या?

इंडिया ए कडून पृथ्वी आणि ऋतुराज गायकवाडने 35 धावांची सलामी दिली. पृथ्वी शॉ आज मोठी खेळी खेळू शकला नाही. तो 17 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर ऋतुराजने राहुल त्रिपाठीच्या मदतीने डाव सावरला. ऋतुराज 41 धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठीने 31 धावा केल्या.

कॅप्टन संजूची विजयी सुरुवात

कॅप्टन संजू सॅमसन आणि रजत पाटीदारच्या जोडीने विजयावर शिक्कामोर्तब केलं. संजूने नाबाद 29 आणि रजतने नाबाद 45 धावा केल्या. पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाने पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. 32 षटकातच इंडिया ए ने 168 धावांच लक्ष्य गाठलं.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें