वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने! बांगलादेशकडून पराभव तरी कसं जुळणार गणित?
दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशसारख्या संघाने पाकिस्तानला कसोटीत पराभवाचं पाणी पाजलं आहे. ते देखीत त्यांच्याच मायभूमीत..त्यामुळे सर्वत्र स्तरातून पाकिस्तान संघावर टीका होते. डाव घोषित करूनही अशी वेळ येणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे. पण असं असलं तरी पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकते. कसं ते समजून घ्या

कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केल्याने क्रीडारसिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 31 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न होतं. पण या पराभवामुळे आता हे गणित शक्य आहे की नाही असा प्रश्न आहे. तर अजूनही पाकिस्तान अंतिम फेरी गाठू शकते. पण त्यासाठी पाकिस्तानला उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. पण हे गणित वाटते तितकं सोपं नाही. कदाचित पाकिस्तान बांगलादेशविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकेल पण पुढच्या कसोटी मालिका या इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध आहे. त्यात पाकिस्तान दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे येथे सामना जिंकणं खूपच कठीण आहे.
बांगलादेशने पराभूत केल्याने पाकिस्तान संघाची आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. पाकिस्तानची विजयी टक्केवारी 30.56 इतकी आहे. त्यामुळे पहिल्या दोनपैकी एक स्थान गाठण्यासाठी उर्वरित सर्वच सामन्यात विजय मिळवावा लागले. पण हे काय शक्य होईल असं वाटत नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातच लढत होईल असं दिसत आहे. कारण हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. भारताने 6 सामने जिंकले आहेत आणि विजयी टक्केवारी 68.52 इतकी असून पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामन्यात विजय मिळवून 62.50 टक्केवारी गाठली आहे. या टक्केवारीसह ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केल्याने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. दरम्यान बांगलादेशचा संघ पुढच्या महिन्यात दोन सामन्यांच्या लढतीसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला तर अंतिम फेरीचं गणित सोपं होणार आहे. अन्यथा भारताची वाटही बिकट होऊ शकते. कारण त्यानंतर न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे या 8 सामन्यात कसोटी लागणार हे निश्चित आहे.
