WTC Final : ‘या’ खेळाडूची अनुपस्थिती भारतासाठी मोठा तोटा, माजी बीसीसीआय सिलेक्टरची प्रतिक्रिया

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरु होईल. दोन्ही संघानी आपआपल्या अंतिम खेळाडूंची यादी जाहिर केली आहे.

WTC Final : 'या' खेळाडूची अनुपस्थिती भारतासाठी मोठा तोटा, माजी बीसीसीआय सिलेक्टरची प्रतिक्रिया
हार्दिक पंड्या

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) शानदार प्रदर्शन करत आईसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC Test Championship) फायनलपर्यंत झेप घेतली आहे. फायनलमध्ये भारत न्यूझीलंड संघासोबत भिडणार असून हे दोन्ही संघ आयसीसी रँकिगमध्ये अव्वल क्रमांकावर आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ आपआपली रणनीती आखत आहेत. दरम्यान बीसीसीआयचे माजी निवडकर्ते वेंकटपति राजू (Venkatapathy Raju) यांनी अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्याच्या (Hardik pandya) नसण्याने भारतीय संघाला मोठा तोटा होण्याची शक्यता वर्तविली आहे. (India Team Will miss All rounder Hardik Pandya in ICC World Test championship Final Says Venkatapathy Raju)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यात हार्दीकला संघात घेण्यात आलेले नाही. त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला संधी देण्यात आली आहे. जाडेजा आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने उत्तम अशी कामगिरी करतो. मात्र जाडेजा एक फिरकीपटू असून हार्दीकसारख्या वेगवान अष्टपैलूची गरज भारताला लागेलच असं राजू यांनी म्हटलं आहे.

हार्दिकची कामगिरी महत्त्वाची

राजू यांनी स्पोर्टकीड़ाशी बोलताना सांगितले, “न्यूजीलंडकडे बरेच अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांची फलंदाजी मजबूत आहे. त्यांचा अष्टपैलू खेळाडू काइल जेमिसन (Kyle Jamieson) लाल चेंडूने भेदक गोलंदाजी करतो. त्याने भारत, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध उत्तम प्रदर्शन केलं आहे. त्यामुळे न्यूझीलंडकडे उत्तम अष्टपैलू खेळाडू असून भारताकडे मात्र फिरकीपटू अष्टपैलू आहे. त्यात हार्दिक परदेशी भूमीत चांगली कामगिरी करत असल्याने त्याची कमी नक्कीच जाणवेल. ”

किवीविरुद्ध भारताचं मिशन 72 तास

क्रिकेटच्या सामन्यांची रणनीती ही शक्यतो मैदानावर सराव करताना आखली जाते. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल

WTC Final ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर…?

आयसीसीने अंतिम सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन जाहीर केल्या आहेत. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून ट्रॉफी देण्यात येईल, असं आयसीसीने जाहीर केलंय. तसंच 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसात जर 30 तासांचा खेळ शक्य नसल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल.

हे ही वाचा :

WTC फायनल खेळायचीय, भारतीय संघाला ICC चे कडक नियम पाळावेच लागतील!

Video : IPL मॅचेससाठी चहलची बायको युएईला जाण्यासाठी तयार, BCCI ने घोषणा करताच डान्सचा खास व्हिडीओ शेअर

एक पराभव आणि प्रशिक्षकाला डच्चू, नामांकित संघाने महान माजी खेळाडूला घरी पाठवलं!

(India Team Will miss All rounder Hardik Pandya in ICC World Test championship Final Says Venkatapathy Raju)